एक्स्प्लोर

ब्लॉग: तिल्हेर गावचे दिलेर

एकीकडे मेट्रो, मोनो, बुलेट ट्रेन अशा वाटेवरचे आपण तर दुसरीकडे आयुष्याची वाट घडवण्यासाठी शाळेत निघालेल्या कच्च्याबच्च्यांना साधी धड वाटही आपण उपलब्ध करून देऊ शकत नाही, उलट वाटच लावतोय.

बुलेटिन करता करता कधी कोणत्या बातमीची गाठ पडेल, कोणती बातमी तुम्हाला आतमध्ये भिडेल सांगता येत नाही. तसंच आज झालं, वसईतल्या तिल्हेर गावातली ती बातमी पाहून गलबलून आलं, चीड आली आणि आपलीच लाजही वाटली. शाळा गाठण्यासाठी साधा रस्ताही नसलेली १०-१२ वर्षांची कोवळी मुलं पाण्यात चिंब भिजण्याची कसरत करत शाळेत पोहोचतात. कपड्यांचा दुसरा सेट दप्तरात असतो, तोही भिजतो, ती मुलं सांगत होती. त्यांचे बाईट्स ऐकून त्यांच्या जिद्दीला सलाम करतानाच, आपल्या देशात त्यातही देशाच्या आर्थिक राजधानीपासून काही किलोमीटरवर असलेल्या गावात बेसिक सोयी-सुविधाही आपण पुरवू शकत नाही, याबद्दल खंत वाटली. नव्हे शरमेने मान खाली गेली. इथे आम्ही दिवाळी साजरी करत असताना ती मुलं मात्र पाण्यातून गारठून, ओलेचिंब होत शाळेत जातात, शाळेत जाण्यासाठी जीवघेण्या प्रवासाची परीक्षाच जणू. एकीकडे मेट्रो, मोनो, बुलेट ट्रेन अशा वाटेवरचे आपण तर दुसरीकडे आयुष्याची वाट घडवण्यासाठी शाळेत निघालेल्या कच्च्याबच्च्यांना साधी धड वाटही आपण उपलब्ध करून देऊ शकत नाही, उलट वाटच लावतोय. स्वत:चीच चीड आली. २१ व्या शतकात महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहणारे, तरुणांचा देश म्हणून मिरवणारे आपणच आणि त्याच ठिकाणी शाळेत जाणाऱ्या मुलांना सोयी-सुविधाही न पुरवणारे आपणच. हे किती परस्पर विरोधी चित्र आहे. त्याच वेळी या जिद्दी मुलांचं आणि त्यांना तितक्याच जिद्दीने शिकवणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांचं खूप कौतुक वाटलं. अभिमान वाटला. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही ते शिकतायत, एक दिवस नव्हे तर रोज अशा खडतर वाटेतून प्रवास करून शाळेत जाऊन नवी वाट निर्माण करण्याची आशा बाळगतायत. कुठे लाकडी ओंडक्याचा पुल तर कुठे पाण्यातून दोर हाती धरत काढलेली वाट...तरीही मुलांच्या चेहऱ्यावर संतापाची, रागाची भावना कुठेही नाही. खरंच मुलं तुम्हाला खूप काही शिकवून जातात ते हेच. ही मुलं ग्रेट मोटिव्हेटर आहेत, सगळ्यांसाठीच. खास करून आयुष्याला कंटाळून व्यसनाच्या किंवा कधीकधी मृत्यूलाही कवटाळणाऱ्यांसाठी तर जास्तच. इतक्या कठीण परिस्थितीतही शिकण्याची आस कायम ठेवत या मुलांनी जो मेसेज दिलाय त्याला तोड नाही. तुमच्या आमच्या आयुष्यातल्या वाटेतही असे अनेक स्पीड ब्रेकर्स येतात, अडचणी येतात. तेव्हा आपण कधी कधी निराश होतो, सारं काही संपलंय असं वाटतं. त्यांनी या मुलांचा आदर्श जरुर घ्यायला हवा. त्यांच्या जिद्दीचा दोर किती मजबूत आहे ते पाहावं, पाण्यातून वाट काढत पुढची वाट गाठणारी ही मुलं आणि त्यांचे आई-वडील या दोघांनाही सलाम. त्याच वेळी संबंधित प्रशासनाला इतकंच सांगावंस वाटतं उघडा डोळे बघा नीट.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद;  राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद;  राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
Embed widget