एक्स्प्लोर

लघुपटांचं 'बिझनेस मॉडेल'

नवजोत गुलाटीच्या  'बेस्ट गर्लफ्रेंड' या शॉर्टफिल्मची सध्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर आणि युट्यूबवर धुम चालू आहे. व्यवसायाने चित्रपट पटकथालेखक असणाऱ्या नवजोत त्याने लिहिलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहून कंटाळला होता. या 'ट्रानझिशन पिरीयड'मध्ये माशा मारत बसण्यापेक्षा स्वतःची जमलेली थोडीफार गंगाजळी वापरून त्याने 'बेस्ट गर्लफ्रेंड' ही शॉर्टफिल्म बनवली. त्याच्या या निर्णयाला अपेक्षेपेक्षा पण जास्त यश मिळाले. ही शॉर्टफिल्म युट्यूबवरवर हिट झाली. या यशामुळे नवजोतला अनेक नवीन प्रोजेक्ट्स मिळाले. आता या यशामुळे  उत्साहित झालेला नवजोत एका प्रोडक्शन हाउससाठी 'लोकल गर्लफ्रेंड' ही वेब सीरिज बनवत आहे. पण हे यश फक्त प्रोत्साहनपर पातळीवर किंवा पुढचे प्रोजेक्ट्स मिळण इतक्यापुरतच मर्यादित नाही. नवजोतने शॉर्टफिल्ममध्ये टाकलेला पैसा पुन्हा मिळवलाच, वर बऱ्यापैकी नफापण कमावला आहे. यामागे गेल्या काही वर्षात शॉर्टफिल्ममेकिंगच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेले सकारात्मक बदल कारणीभूत आहेत. काही वर्षांपूर्वी कुणी 'शॉर्टफिल्म मेकिंग' मधून पैसा मिळू शकतो असे विधान केले असते तर लोकांनी खचितच त्याला वेड्यात काढले असते. त्या काळात शॉर्टफिल्म ही फक्त आपल्या गुणवत्तेचे 'एक्झीबिशन' करणे एवढ्या मर्यादित हेतूने बनवली जायची.  काही वर्षापूर्वी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शॉर्टफिल्म नेण्यासाठी आवश्यक व्यासपीठ पण उपलब्ध नव्हती. पण गेल्या चार पाच वर्षात परिस्थिती झपाट्याने बदलत चालली आहे. यातून शॉर्टफिल्मच स्वतःच असं एक 'बिझनेस  मॉडेल' तयार झालं आहे. तर काय आहे हे ' बिझनेस मॉडेल'? याचा हा आढावा. युट्यूब नावाचं वरदान गुगलवर वैयक्तिक माहितीवर अतिक्रमण करत असल्याचे आणि मोनोपोली निर्माण करण्याचे आरोप लागत आहेत. पण त्यामुळे माध्यमांचं 'लोकशाहीकरण' करत असण्याचं त्यांच कर्तृत्व नजरेआड करता येत नाही. युट्यूबमुळे शॉर्टफिल्म मेकर्स ना एक मोठ व्यासपीठ मिळालं आहे. महत्वाचं म्हणजे जर तुम्ही युट्यूबवर पोस्ट करत असणारा 'कंटेंट ' हा 'ओरिजनल ' असेल आणि दर्जेदार असेलं तर तुम्हाला त्यातून आर्थिक प्राप्ती होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या युट्यूब अकाऊंटच्या सेटिंगमध्ये जाऊन गुगलला 'अॅड प्लेसिंग' करण्याची परवानगी द्यावी लागते. तुमच्या 'पोस्ट' ला जितक्या जास्त हिट्स तितकी तुमची अर्थप्राप्ती जास्त असा साधा सरळ हिशोब आहे. पण तुम्ही जो व्हिडीओ पोस्ट करत असाल त्यावर तुमचा 'प्रताधिकार' हवा. जर तुम्ही दुसऱ्याच्या पोस्ट स्वतःच्या नावावर खपवायचा प्रयत्न केला आणि  'ओरिजिनल' निर्माता/दिग्दर्शकाने त्यावर आक्षेप घेतला तर युट्यूब तो व्हिडीओ काढून टाकतं. 'कंटेंट इज किंग' असे जे मनोरंजन व्यवसायात वारंवार ऐकायला मिळते त्याची प्रचीती इथे पण येते. जर तुमची शॉर्टफिल्म चांगली निर्मितीमूल्य असणारी असेल आणि कथानक चांगले असेलं तर त्याला जास्त 'विजीट' मिळतात. लेखाच्या सुरुवातीला ज्या नवजोत गुलाटीचा उल्लेख केला आहे त्याच्या 'बेस्ट गर्लफ्रेंड ' या शॉर्टफिल्मला आतापर्यंत ऐंशी लाख 'विजीट ' मिळाल्या आहेत . अर्थातच नवजोत खुश आहे . साधारण दर दहा लाख 'हिट्स ' मागे त्याला काही हजार रुपये (नक्की आकडा त्याने सांगितला नाही पण तो पाच आकडी आहे आणि बऱ्यापैकी मोठा आहे ) गुगलकडून मिळाले आहेत . लवकरच त्याची शॉर्टफिल्म एक कोटीचा आकडा पार करेल तेंव्हा  एक मोठी रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा होईल हे नक्की .  जर तुमच्यात चांगले मार्केटिंग स्किल्स असतील तर तुमची 'रिकवरि ' होण्याची शक्यता जास्त . त्यासाठी तुम्हाला तुमच्या शॉर्टफिल्मची युट्यूब लिंक विविध सोशल नेटवर्किंग साईट्सवर (फेसबुक , ट्वीटर, ब्लॉग ई . ) टाकून जास्तीत जास्त प्रेक्षकांना ती फिल्म  बघायला लावण्याचं कसब साधता यायला हवं . युट्यूबवर आपली कलाकृती पोस्ट करून कमाई करणारा नवजोत हा एकटा नाही . अनेक शॉर्टफिल्म मेकर्स  हा रस्ता चोखाळत आहेत . एक तर आपल्या शॉर्टफिल्मला अतिशय लोकप्रिय व्यासपीठ मिळत आणि त्यातून उत्पन्न पण मिळत . असा 'डबल ' फायदा इथे आहे. मोठ्या चित्रपट निर्मितीगृहांचं पदार्पण मी फेसबुकवर एका फिल्ममेकर्स ग्रुपचा सदस्य आहे . गेल्या महिनाभरातच  त्या ग्रुपमध्ये सुभाष घईची मुक्ता आर्ट्स , एकता कपूरची बालाजी आणि इरॉस या सारख्या मोठ्या प्रोडक्शन हाउसनि शॉर्टफिल्म मेकर्सना त्यांच्या कडे काही नवीन युनिक शॉर्टफिल्मच्या संकल्पना असतील तर त्या मेल करण्याचे आव्हान केले आहे . जर त्यांना तुमची संकल्पना आवडली तर त्याची निर्मिती करण्यास ते तुम्हाला आर्थिक मदत करणार . सुभाष घई यांनी तर शॉर्टफिल्म बनवण्यासाठी प्रत्यक्ष युट्युबशीच हातमिळवणी केली आहे . वेब सिरीज निर्मितीकडे या निर्मात्यांचा कल वाढला आहे .दोन वर्षांपूर्वी अनुराग कश्यपच्या 'फँटम फिल्म्स' ने तर चक्क एखाद्या चित्रपटाप्रमाणे वीजचोरीच्या विषयावर बनलेल्या 'कटियाबाज' या डॉक्युमेण्ट्रिचे वितरण आणि प्रदर्शन केले होते. या सर्व घटना बड्या चित्रपटनिर्मात्यांचा 'डिजिटल फिल्म मेकिंग' कडे झुकलेला कल दाखवतात. पूर्वी शॉर्टफिल्म स्वतःच्या खिशाला चाट देऊन बनवण्याशिवाय पर्याय नसायचा.  मात्र हल्ली जर तुमची 'कन्सेप्ट ' चांगली असेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यापासूनच आर्थिक सहाय्य या चित्रपटनिर्मात्यांकडून मिळु शकत . इरॉस सारखे मोठे निर्मितीगृह 'नेटफ्लिक्स' चा भारतीय अवतार तयार करण्याच्या मागे आहेत. या सर्व घटना शॉर्टफिल्म मेकर्ससाठी उत्साहवर्धक आहेत . शॉर्टफिल्म फेस्टिव्हल्स सध्या देशात सर्वत्र फिल्म फेस्टिवलसचं पेव फुटलं आहे. जवळपास प्रत्येक मोठ्या शहराचा स्वतःचा असा एक फिल्म फेस्टिवल असतो. जसं की मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. नवी मुंबई, औरंगाबाद, नागपूर या शहरांमध्ये पण फिल्म फेस्टिवल्स भरवले जात आहेत. याचा फायदा चित्रपट साक्षरतेचा प्रसार होण्यासाठी होतोच पण अनेक होतकरू चित्रपट दिग्दर्शक -निर्मात्यांना आपले चित्रपट दाखवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून पण होतो . हल्ली जवळपास प्रत्येक फिल्म फेस्टिवलमध्ये लघुपटासाठी वेगळा विभाग असतो . आपल्याकडच्या शॉर्टफिल्म मेकर्सना पूर्वी यासाठी फक्त बाहेरच्या देशात होणाऱ्या फिल्म फेस्टिवल्सवर अवलंबून राहावं लागायचं .  महागड्या एन्ट्री फी मुळे  ते सर्वांनाच परवडायच नाही . शिवाय ग्रामीण किंवा निमशहरी भागातून आलेल्या शॉर्टफिल्म मेकर्सना याची माहितीच नसायची आणि माहिती असली तरी भाषेचे वैगेरे अडथळे पार करताना त्यांची तारांबळ उडायची . पण आता देशांतर्गत फिल्म फेस्टिवल्स व्हायला लागल्यापासून त्यांना एक हक्काच व्यासपीठ मिळालं आहे . या फिल्म फेस्टिवल्समध्ये सर्वोत्तम लघुपट स्पर्धा पण भरवल्या जातात आणि विजेत्यांना आकर्षक बक्षीस पण ठेवली जातात . त्यातून पण शॉर्टफिल्म मेकर्सना बऱ्यापैकी आर्थिक प्राप्ती होऊ शकते. पण या उत्साहवर्धक घटना घडत असल्या तरी आपण याबाबतीत अमेरिका आणि युरोपियन देशांच्या अजूनही खुप मागे आहोत . तिथे चित्रपटगृहात लघुपटांच्या 'पेड स्क्रीनिंग ' होतात . अनेक पोर्टल्स 'पे पर व्ह्यू ' तत्वावर लघुपट दाखवतात . तिथे अनेकदा एखाद्या शॉर्टफिल्मचे प्रताधिकार विकत घेऊन त्यावर निर्मात्यांनी चित्रपट निर्मिती केल्याची पण उदाहरण आहेत. अर्थातच आपण एक देश म्हणून शॉर्टफिल्मच्या बाबतीत बाल्यावस्थेत आहोत कारण आता कुठे आपल्याकडे लघुपटक्षेत्र बाळसे धरायला लागले आहे. त्यामानाने आपण प्रगतीचा पल्ला लवकरच गाठला आहे असे म्हणावे लागेल. त्यामुळे या प्रगतीबाबत आपण आनंदी असायला हरकत मुळीच नसावी पण समाधानी होण्याची चूक होऊ नये असे वाटते.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget