Yearly Horoscope 2025 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
New Year 2025 Yearly Horoscope : ग्रहांच्या स्थितीमुळे 2025 वर्ष हे सर्व राशींसाठी खास असणार आहे. तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या वर्षात कशी राहील? सर्व राशींचे वार्षिक राशीभविष्य जाणून घेऊया.
Yearly Horoscope 2025 : नवीन वर्ष 2025 बुधवारी, 1 जानेवारीपासून सुरू झालं आहे. नवीन वर्ष अनेक राशींसाठी महत्त्वाचं असणार आहे. या वर्षात काही राशींना लाभ मिळणार आहे. तर, काही राशींना तोटा सहन करावा लागणार आहे. एकूणच 2025 वर्ष तुमच्यासाठी कसं असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे वार्षिक राशीभविष्य (Yearly Horoscope 2025) जाणून घेऊया.
मेष रास (Aries Yearly Horoscope 2025)
नवीन वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी प्रगतीचं आणि यशाचं असणार आहे. व्यावसायिकांसाठी हे वर्ष जवळपास अनुकूल असेल. नोकरीत प्रगतीची स्थिती राहील. जमीन आणि इमारती इत्यादींच्या खरेदी-विक्रीसाठी हा काळ अनुकूल राहील. प्रेमसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगा.
वृषभ रास (Taurus Yearly Horoscope 2025)
नवीन वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभवार्ता घेऊन येणार आहे. तुमच्या मनातील इच्छा या काळात पूर्ण होतील. खाण्यापिण्याच्या बाबतीत काळजी घ्या. जर तुम्हाला मालमत्ता खरेदी करायची असेल, तर वर्षाच्या पहिल्या महिन्यांच्या तुलनेत वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत अनुकूल परिस्थिती असेल. प्रेमसंबंधांमध्ये थोडा तणाव राहील. जोडीदारामध्ये काही मतभेद होतील.
मिथुन रास (Gemini Yearly Horoscope 2025)
नवीन वर्ष तुमच्यासाठी शुभ राहील. अनावश्यक वादविवाद टाळा, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. प्रेमसंबंधांमध्ये चढ-उतार येऊ शकतात, परंतु परस्पर समन्वय राखता येईल. विवाहाबाबत काही तडजोड करावी लागेल. शत्रूकडूनही त्रास होऊ शकतो. कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात.
कर्क रास (Cancer Yearly Horoscope 2025)
या राशीच्या लोकांना नवीन वर्षात संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. जर एखाद्या व्यक्तीला जमीन, वाहन आणि घर खरेदी किंवा विकायचं असेल तर त्याच्यासाठी काळ शुभ आहे. प्रवासाच्या संधी प्राप्त होतील. व्यवसायात मोठ्या लाभाची स्थिती निर्माण होऊ शकते.
सिंह रास (Leo Yearly Horoscope 2025)
नवीन वर्षात सिंह राशीच्या लोकांचं आरोग्य सुधारेल. अडकलेला पैसा मिळेल. आर्थिक क्षेत्रात लाभ होईल. या वर्षी अनावश्यक वादविवाद टाळा. कोणतीही मालमत्ता खरेदी करायची असल्यास वर्ष अनुकूल राहील. व्यवसायात पैसे गुंतवल्यास फायदा होईल.
कन्या रास (Virgo Yearly Horoscope 2025)
नवीन वर्षात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आर्थिक बाबींमध्ये हे वर्ष सामान्य आणि कधीकधी कठीण असू शकतं. या वर्षी जमीन आणि इमारत खरेदीची शक्यता आहे. तुम्हाला बोनस मिळू शकतो. कुटुंबातील मतभेद सुधारतील.
तूळ रास (Libra Yearly Horoscope 2025)
नवीन वर्षात तूळ राशीच्या लोकांनी विचार करूनच कोणावरही विश्वास ठेवावा, अन्यथा त्यांना तणावाचा सामना करावा लागू शकतो. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून फायदा होऊ शकतो. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष सामान्य राहील.
वृश्चिक रास (Scorpio Yearly Horoscope 2025)
वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष अनुकूल असेल. हे वर्ष बहुतांशी फायदेशीर आणि प्रगतीचं असेल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. पदोपदी प्रगतीची संधी मिळेल.
धनु रास (Sagittarius Yearly Horoscope 2025)
धनु राशीसाठी नवीन वर्षाचा मध्य थोडा संघर्षाचा असेल. कौटुंबिक सुख-शांती राखण्याचा प्रयत्न करा. भावंडं आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीची शक्यता आहे. वाहनं काळजीपूर्वक चालवा. नोकरी-व्यवसायात लाभदायक परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
मकर रास (Capricorn Yearly Horoscope 2025)
नवीन वर्षात नोकरीत बदल किंवा बदली होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ संमिश्र राहील. प्रेमसंबंधांत थोडा संयम ठेवा, अन्यथा मानसिक ताणाला सामोरं जावं लागू शकतं. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. मालमत्ता आणि गुंतवणुकीतून लाभ होईल.
कुंभ रास (Aquarius Yearly Horoscope 2025)
नवीन वर्षात तुम्ही संयमाने आणि बुद्धीने काम करा. मालमत्ता, घर आणि वाहनांच्या खरेदी-विक्रीत सावधगिरी बाळगा. न्यायालयीन प्रकरणांमध्ये खर्च वाढू शकतो. पत्नीच्या तब्येतीची थोडी चिंता असू शकते. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे.
मीन रास (Pisces Yearly Horoscope 2025)
नवीन वर्ष मीन राशीच्या लोकांसाठी अनुकूल असेल. सामाजिक कार्यात व्यक्तीचा सन्मान वाढेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. नोकरदार लोकांनाही पदोन्नती इत्यादीचे लाभ मिळू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :