Weekly Horoscope 24 To 30 March 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 24-30 March 2024 : साप्ताहिक राशीभविष्याच्या दृष्टीने मेष ते कन्या राशीसाठी नवीन आठवडा महत्त्वाचा असणार आहे. या काळात काही राशींना शुभ फल प्राप्त होईल, तर काही राशींना अडचणींचा सामना करावा लागेल. मेष ते कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 24-30 March 2024 : मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. मेष आणि कर्कसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. मार्चचा नवीन आठवडा (17 March To 23 March Weekly Horoscope) तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनी आठवड्याच्या सुरुवातीला चांगले निर्णय घेतल्यामुळे त्यांना सर्व कामात यश मिळेल. या आठवड्यात तुम्हाला मित्रांकडून सहकार्य मिळेल, तुम्ही त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता, त्यांच्या सहकार्याने तुमची व्यवसायातील कामं पूर्ण होतील. या आठवड्यात घरात तुमच्या लग्नाची चर्चा होऊ शकते. आठवड्याच्या मध्यात कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबात काही अशा गोष्टी घडतील, ज्यामुळे कुटुंबातील वातावरण हलकं आणि आनंदी राहील. नोकरीतही तुमची स्थिती सुधारेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्ही लव्ह लाईफमध्ये बिझी असाल. तुमच्यात आणि तुमच्या प्रियकरात चांगली केमिस्ट्री असेल, पण बाहेरचे लोक तुमच्या नात्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे सावध राहा.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक लाभ मिळाल्याने ते आनंदी होतील, या काळात तुम्ही कुठेतरी लांबच्या प्रवासाला जाण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. आठवड्याच्या मध्यात भाऊ आणि मित्रांसोबत चांगली चर्चा होईल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचं सहकार्य लाभेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. तुमच्या वडिलांची तब्येत कमजोर असल्यामुळे तुम्हाला थोडी चिंता वाटू शकते. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला आत्मविश्वासाने परिपूर्ण असतील, यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनातही तुमच्या जोडीदाराची साथ लाभेल, तो तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढेल आणि तुमची ट्यूनिंग चांगली राहील. या आठवड्यात व्यवसायात सुधारणा होईल, आर्थिक लाभाची शक्यता राहील. आठवड्याच्या मध्यात कौटुंबिक समस्यांवर चर्चा होईल. घरातील वातावरण सकारात्मक राहील. आर्थिक लाभ होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात मित्रांशी जास्त बोलणं टाळा. ऑफिसमध्येही सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल, पण कोणाशीही जास्त बोलू नका.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला जास्त खर्चामुळे त्रास होईल. तुमची तब्येत बिघडू शकते. काही कामाबाबत मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात ही सर्व परिस्थिती नीट होईल आणि तुमची तब्येत सुधारेल. तुमचं मन प्रसन्न होईल. वैवाहिक जीवनात रोमान्स राहील. व्यवसायासाठी वेळ उत्तम राहील. व्यवसायातून तुम्हाला फायदा होईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात आर्थिक लाभ होईल. बँक बॅलन्स वाढेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील.
सिंह रास (Leo)
सिंह राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या बॉससोबत चांगले संबंध बनवण्यात व्यस्त राहतील. आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवसांत व्यावसायिकांना चांगलं उत्पन्न मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. नवीन आठवड्यात धनप्राप्ती होईल. तुमची लव्ह लाईफ सुखाची असेल आणि विवाहित लोकांना त्यांच्या मुलांकडून प्रेम मिळेल. आठवड्याच्या मध्यात खर्च वाढतील, आरोग्य बिघडेल. तुम्ही अधिक भावूक व्हाल. आरोग्य नाजूक राहील. पण आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुमचा आत्मविश्वास वाढेल, पण अनेक समस्या तुम्हाला सतावतील. व्यवसायात निराशा मिळेल, ही स्थिती तणावाची असेल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला करिअरबाबत खूप सकारात्मक राहतील. तुम्ही परिश्रम कराल, परंतु एखाद्या गोष्टीबद्दल नाराजी बघायला मिळेल. तुम्ही या काळात कौटुंबिक जीवनाकडे पूर्ण लक्ष द्याल, कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्याल. आठवड्याच्या मध्यात आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही रोमँटिक राहाल, तुम्हाला तुमच्या प्रियकराचं सहकार्य मिळेल. तुमच्या काही खास गोष्टी तुमच्या बॉसला प्रभावित करू शकतात. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत खर्च वाढेल. आरोग्य खालावेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
शनिवारच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' 5 गोष्टी; शनिदेव होतील नाराज, प्रगतीच्या मार्गात येतील अडथळे