(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gemini Weekly Horoscope 17 To 23 March 2024 : मिथुन राशीचा नवीन आठवडा समस्यांचा; गुंतवणूक करताना सावधान, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Gemini Weekly Horoscope 17th To 23rd March 2024 : मिथुन राशीला या आठवड्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. नोकरी व्यवसायात तुम्हाला अनेक समस्या जाणवतील. तुमची लव्ह लाईफ देखील तणावाची असेल.
Gemini Weekly Horoscope 17 To 23 March 2024 : राशीभविष्यानुसार, मिथुन राशीचा हा आठवडा कठीण काळाचा असणार आहे. लव्ह लाईफमधील समस्या सोडवण्यासाठी तुम्हालाच काही तोडगा काढावा लागणार आहे. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल, पण तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. एकूणच मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मिथुन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मिथुन राशीची लव्ह लाईफ (Gemini Love Horoscope)
या आठवड्यात तुम्ही तुमच्या लव्ह लाईफकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव करा. अगदी तडाक्याच्या वादात देखील शांत राहा. तुम्ही तुमच्या नात्यात प्रामाणिक असलं पाहिजे, यामुळे तुमचे बंध आणखी घट्ट होतील. अविवाहित लोक या आठवड्यात एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची शक्यता आहे आणि तुम्ही त्याच्यासोबत तुमचं नातं पुढे नेऊ शकता. लाँग डिस्टन्स रिलेशनमध्ये असणाऱ्यांना जोडीदारासोबत योग्य संवाद ठेवावा लागेल.
मिथुन राशीचे करिअर (Gemini Career Horoscope)
नवीन आठवड्यात तुमच्या ऑफिसमध्ये एखादी कल्पना मांडताना काळजी घ्या. कदाचित तुमच्या काही वरिष्ठांना ही गोष्ट आवडणार नाही आणि ते तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतील. याचा परिणाम तुमच्या मनोबलावर होईल. ऑफिसमध्येही वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा. वकील, नोकरदार, वास्तुविशारद, प्राध्यापक, लेखक, कलाकार, स्वयंपाकी आणि कॉपीरायटर यांना या आठवड्यात यश मिळेल.
मिथुन राशीची आर्थिक स्थिती (Gemini Wealth Horoscope)
या आठवड्यात तुमचे पैसे जास्त वाया घालवू नका आणि वाईट काळासाठी ते वाचवून ठेवा. या आठवड्यात तुमच्या कुटुंबात आर्थिक समस्या निर्माण होतील, भावंडांमध्ये मालमत्तेवरुन भांडण होऊ शकतं. काही मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही गुंतवणूक करू नका, हा काळ तुमच्यासाठी चांगला नाही. ज्यांचा व्यवसाय आहे ते या आठवड्यात व्यवसाय वाढवण्याचा विचार करतील.
मिथुन राशीचे आरोग्य (Gemini Health Horoscope)
तुमचं आरोग्य या आठवड्यात चांगलं असेल. ज्यांना शुगरचा त्रास आहे, त्यांनी खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी. जेवताना तुमच्या ताटात जास्त भाज्या असाव्यात. या आठवड्यात तुम्ही सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांसोबत अधिक वेळ घालवू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :