एक्स्प्लोर

Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. काही राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल. ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

सोमवारपासून सुरू होणारा नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम ठरेल. या काळात तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. या आठवड्यात तुमच्या कामाचं कौतुक होईल, हा आठवडा केवळ करिअरमध्येच नाही, तर व्यवसायातही चांगला राहील. या आठवड्यात तुमचा कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. कुटुंबात एकता राहील. प्रियकरासोबत चांगला वेळ घालवाल.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात कामात सावध राहावं. एक छोटीशी चूक तुमच्यासाठी महागात पडू शकते. तुम्ही नोकरी करत असाल तर तिथे तुमचं काम इतरांवर सोपवू नका. या आठवड्यात तुम्हाला अचानक मोठा खर्च करावा लागू शकतो. मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद चालू असेल तर तो अधिक गंभीर होऊ शकतो. मन आणि राग या दोन्हींवर नियंत्रण ठेवत एक एक गोष्टी साध्य करता येतील.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यशाचा ठरेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील विस्ताराचं नियोजन प्रत्यक्षात येताना दिसेल. प्रेम संबंधात सुसंगतता असेल आणि तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत अधिकाधिक आनंददायी क्षण घालवू शकाल.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र जाईल. या आठवड्यात तुमच्या काही महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात. चुकीच्या संगतीपासून लांब राहा. आरोग्याशी कोणत्याही प्रकारे खेळू नका. या आठवड्यात कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. तुम्ही व्यवसाय करत असाल तर या आठवड्यात काही गोष्टींवर विशेष लक्ष द्या. या आठवड्यात तुम्ही एखाद्याकडे आकर्षित होऊ शकता.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ राहील. तुम्हाला प्रत्येक पावलावर यश आणि सन्मान मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. मित्रांच्या पाठिंब्याने तुमचे बहुतेक नियोजन यशस्वी होईल आणि तुमची कीर्ती वाढेल.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहील. पण या आठवड्यात तुम्हाला घाई टाळावी लागेल. कोणतेही नियम किंवा कायदे मोडू नका. कार्यालयात विरोधकांपासून सावध राहा. तुमच्या कामात लोक अडथळे निर्माण करू शकतात किंवा कोणाच्याही फसवणुकीत अडकू नका, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागेल.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा हा सर्वसामान्य असणार आहे. या राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा जास्त ताण जाणवेल. पण, तुम्ही अत्यंत मेहनत घेऊन दिलेलं काम वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या ज्या काही योजना तुम्ही आखल्या आहेत त्या पूर्ण होतील. आठवड्याच्या शेवटी तुमचा प्रवासाला जाण्याचा चांगला योग आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चढ-उतारांचा असणार आहे. तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. यावेळी तुमचा सकारात्मक दृष्टीकोन असणं गरजेचं आहे. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक चणचण देखील भासू शकते. पण, मेहनत करत राहा. तसेच, आरोग्याची काळजी घ्या. व्यापारी वर्गातील लोकांना कामानिमित्त बाहेर जावं लागण्याची शक्यता आहे. 

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमची जी काही राहिलेली कामं आहेत ती पूर्ण करू शकता. तसेच, गुंतवणुकीच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेण्याचा विचार करत असाल तर चांगला योग आहे. 

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात सावध राहण्याची गरज आहे. आतापर्यंत तुम्ही जे काही काम करत आला आहात त्यावर ठाम राहा. तसेच, नवीन लोकांबरोबर तुमच्या भेटीगाठी वाढतील. समाजकार्यात तुमचं मन जास्त रमेल. त्यामुळे समाजात तुमचा मान-सन्मानही वाढेल. या आठवड्यात मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार मोलाचा ठरणार आहे. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

जुलै महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी फार महत्त्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात तुमची स्वत:ची प्रगती तुम्हाला दिसेल. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. कोणतंही काम करताना आपल्या मेहनतीवर आणि आत्मविश्वासाच्या जोरावर करा. 

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडताना दिसतील. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल. तुमच्या स्वभावाकडे लोक आकर्षित होतील. त्यामुळे सगळ्यांशी नम्रपणे वागा. कामाच्या बाबतीत प्रामाणिक राहा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंचं सहकार्य पाच वर्ष राहील?Nana Patole Vs Chandrakant Patil : शपथविधीसाठी निमंत्रण, नाना पटोले-चंद्रकांत पटालांमध्ये जुंपलीMadhurkar Pichad Demise : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड कालवश, वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासDr.Babasaheb Ambedakar Mahamanav Mahaparinirvan : महामानवाचे महापरिनिर्वाण, जेव्हा कोट्यावधी वंचिताचा आधार हरपला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
Pravin Darekar: राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर... प्रविण दरेकर म्हणाले...
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर...
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
राज ठाकरेंना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला रस, त्यांचे आणि आमचे विचार जुळतात, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
राज ठाकरेंना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला रस, त्यांचे आणि आमचे विचार जुळतात, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
Embed widget