एक्स्प्लोर

Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : साप्ताहिक राशीभविष्याच्या दृष्टीने काही राशीसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 Lucky Zodiacs : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. काही राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल.  मे महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपल्या वाणी आणि व्यवहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. या दरम्यान तुम्ही रागाच्या भरात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका, अन्यथा तुमचे चांगले संबंध खराब होतील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागेल, कारण आठवड्याच्या मध्यात तुम्हाला मौसमी किंवा कोणत्याही दिर्घकालीन आजारामुळे शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो. व्यवसायाशी संबंधित लोकांना या आठवड्यात त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. नोकरदार लोकांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागू शकतो. आठवड्याच्या मध्यात अचानक काही मोठे खर्च उद्भवू शकतात, ज्यामुळे तुमचे बजेट थोडे विस्कळीत होऊ शकते. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. त्यात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या आवडीची एखादी वस्तू खरेदी करू शकता. या काळात कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. जमीन खरेदी-विक्रीतून तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. या काळात अचानक लांब किंवा कमी अंतराचा प्रवास होण्याची शक्यता आहे.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील, त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. नोकरदार महिलांना कामात मोठं यश मिळेल. नशीब तुमच्या बाजूने असेल. कुटुंबातही तुमचा मान-सन्मान वाढेल.करिअर-व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ शुभ आणि लाभदायक आहे, परंतु व्यवसायाशी संबंधित लोकांनी कोणताही मोठा व्यवहार करताना वरिष्ठांचा सल्ला नक्कीच घ्या. आठवड्याच्या उत्तरार्धात नातेवाईकांशी काही विषयावर मतभेद होऊ शकतात.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी हा आठवडा संमिश्र जाणार आहे. या आठवड्यात तुमची नियोजित कामे पूर्ण होतील. जर तुम्ही व्यवसायात गुंतलेले असाल तर या आठवड्यात तुम्हाला व्यवसायाशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील, अन्यथा कोणत्याही योजनेत गुंतवलेले पैसे अडकू शकतात. चुकूनही घाईघाईने निर्णय घेणे टाळा. आठवड्याच्या मध्याचा काळ तुमच्या आरोग्याच्या आणि नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून अनुकूल नसेल. या काळात एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत एखाद्या विषयावर वाद होऊ शकतो.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांनी या आठवड्यात रागावणे आणि गर्व बाळगणे टाळावे, अन्यथा तुमचे केलेले काम बिघडू शकते. आठवड्याच्या सुरुवातीला कामानिमित्त लांब किंवा कमी अंतराचा प्रवास होण्याची शक्यता आहे.आठवड्याच्या मध्यात नोकरीत वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून अपेक्षेपेक्षा कमी सहकार्य मिळेल. या काळात तुमचे विरोधकही सक्रिय राहू शकतात. अशा स्थितीत तुमचे काम अतिशय काळजीपूर्वक करा आणि लोकांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. या काळात नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. संपत्तीत वाढ होईल. प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून या आठवड्यात काही चढ-उतार असणार आहेत.

कन्या रास (Virgo Horoscope)

हा आठवडा कन्या राशीसाठी काहीसा नुकसानकारक असेल. कोणत्याही समस्येवर उपाय शोधताना राग टाळा, मग ते काम असो किंवा वैयक्तिक आयुष्य. आठवड्याच्या सुरुवातीला लहान भावासोबत किंवा बहिणीशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. या काळात, कोणतीही समस्या सोडवताना संवाद साधा. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून वळवण्यासाठी काही विचित्र गोष्टींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात. आठवड्याच्या उत्तरार्धात तुमची बदली एखाद्या नको असलेल्या ठिकाणी होऊ शकते.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांना येत्या आठवड्यात आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला अपेक्षित यश मिळवायचं असेल तर तुमची ऊर्जा वाया जाऊ देऊ नका. आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका. तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी सावलीसारखा उभा राहील. कोणताही निर्णय घेताना भावनेच्या भरात घेऊ नका.

वृश्चिक रास (Scorpio)

नवीन आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरेल. या आठवड्यात तुम्हाला तुमचा आळस सोडावा लागेल. आजचं काम उद्यावर ढकलू नका. जर तुम्ही आर्थिक तंगीने त्रस्त असाल तर या आठवड्यात तुम्हाला थोडा आराम मिळू शकतो. मस्करी करताना इतरांचा अपमान करू नका. कोर्टात गोष्टी तुमच्या बाजूने असल्याचं स्पष्ट दिसून येईल. आठवड्याचा शेवट चांगला होईल.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीचे लोकांसाठी नवीन आठवडा शुभ ठरेल. व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसायात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यात त्यांना यशही मिळेल. काही नवीन संपर्क बनवल्याचा फायदा तुम्हाला मिळेल. वैवाहिक जीवनातही तुम्ही एकमेकांना साथ द्याल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही काही सिक्रेट स्ट्रॅटेजी बनवू शकता, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात मदत होईल. तब्येत कमजोर होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत अचानक एखादे काम पूर्ण झालं तर तुम्ही आनंदी व्हाल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला भावांची साथ मिळेल.

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती आठवड्याच्या सुरुवातीला चांगली राहील. सर्व इच्छा पूर्ण झाल्यामुळे मनामध्ये आनंदाची भावना राहील. तुमचं वैवाहिक जीवन सुखाचं असेल. तुम्हाला जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. तरुणांची लव्ह लाईफही चांगली असेल. व्यवसायात प्रगती होईल, तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. आठवड्याच्या मध्यात खर्च वाढेल. हा आठवडा तुम्ही कामात व्यस्त राहाल. व्यवसायाच्या निमित्ताने लांबचा प्रवास होऊ शकतो. या आठवड्यात तुमचं आरोग्य नाजूक राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्ही मौजमजा कराल. वैवाहिक जीवन देखील आनंदाने भरलेलं असेल.

कुंभ रास (Aquarius)

येणारा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येक लहान-मोठा व्यक्ती तुमच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसेल. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमचा शोध संपणार आहे. तुम्ही व्यवसाय करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील. आठवड्याच्या मध्यात तुम्ही घरासाठी पैसे खर्च करू शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा ठरेल. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. बराच काळ अडकलेला सरकारी पैसा परत मिळू शकेल. कोणाशीही बोलत असाल तेव्हा आवाज सौम्य ठेवा, नाहीतर परिस्थिती बिघडू शकते. या आठवड्यात तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. या आठवड्यात तुमचे छंद जोपासण्यावर तुमचा अधिक पैसा खर्च होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Lucky Zodiacs : नवीन आठवड्यात ग्रहांच्या मोठ्या हालचाली; 'या' 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, नोकरी-व्यवसायात प्रगतीसह होणार बक्कळ धनलाभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget