Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : मेष ते मीन राशीसाठी नवीन आठवडा नेमका कसा असणार आहे यासाठी साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊयात.
Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : मे महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक ग्रह राशी परिवर्तन तर करणारच आहेत पण त्याचबरोबर अनेक राजयोग देखील बनणार आहेत. त्यामुळे अनेक राशींसाठी हा आठवडा खास असणार आहे. मेष ते मीन राशीसाठी नवीन आठवडा नेमका कसा असणार आहे यासाठी साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) अधिक माहिती जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपल्या वाणी आणि व्यवहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. या दरम्यान तुम्ही रागाच्या भरात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. अन्यथा तुमचे चांगले संबंध खराब होतील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागेल कारण आठवड्याच्या मध्यात, तुम्हाला मौसमी किंवा कोणत्याही दिर्घकालीन आजारामुळे शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो. व्यवसायाशी संबंधित लोकांना या आठवड्यात त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. नोकरदार लोकांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागू शकतो. आठवड्याच्या मध्यात अचानक काही मोठे खर्च उद्भवू शकतात, ज्यामुळे तुमचे बजेट थोडे विस्कळीत होऊ शकते.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. त्यात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या आवडीची एखादी वस्तू खरेदी करू शकता. या काळात कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. जमीन खरेदी-विक्रीतून तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. या काळात अचानक लांब किंवा कमी अंतराचा प्रवास होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील, त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. नोकरदार महिलांना कामात मोठं यश मिळेल. नशीब तुमच्या बाजूने असेल. कुटुंबातही तुमचा मान-सन्मान वाढेल.करिअर-व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ शुभ आणि लाभदायक आहे, परंतु व्यवसायाशी संबंधित लोकांनी कोणताही मोठा व्यवहार करताना वरिष्ठांचा सल्ला नक्कीच घ्या. आठवड्याच्या उत्तरार्धात नातेवाईकांशी काही विषयावर मतभेद होऊ शकतात.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी हा आठवडा संमिश्र जाणार आहे. या आठवड्यात तुमची नियोजित कामे पूर्ण होतील. जर तुम्ही व्यवसायात गुंतलेले असाल तर या आठवड्यात तुम्हाला व्यवसायाशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील, अन्यथा कोणत्याही योजनेत गुंतवलेले पैसे अडकू शकतात. चुकूनही घाईघाईने निर्णय घेणे टाळा. आठवड्याच्या मध्याचा काळ तुमच्या आरोग्याच्या आणि नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून अनुकूल नसेल. या काळात एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत एखाद्या विषयावर वाद होऊ शकतो.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांनी या आठवड्यात रागावणे आणि गर्विष्ठ होणे टाळावे, अन्यथा तुमचे केलेले काम बिघडू शकते. आठवड्याच्या सुरुवातीला कामानिमित्त लांब किंवा कमी अंतराचा प्रवास होण्याची शक्यता आहे.आठवड्याच्या मध्यात नोकरीत वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून अपेक्षेपेक्षा कमी सहकार्य मिळेल. यामुळे तुमचे मन थोडे उदास राहील. या काळात तुमचे विरोधकही सक्रिय राहू शकतात. अशा स्थितीत तुमचे काम अतिशय काळजीपूर्वक करा आणि लोकांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. या काळात नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. संपत्तीत वाढ होईल. प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून या आठवड्यात काही चढ-उतार असणार आहेत.
कन्या रास (Virgo Horoscope)
या आठवड्यात कन्या राशीसाठी काहीसा नुकसानकारक असेल. कोणत्याही समस्येवर उपाय शोधताना राग आणि अभिमान टाळा, मग ते काम असो किंवा वैयक्तिक आयुष्य. आठवड्याच्या सुरुवातीला लहान भावासोबत किंवा बहिणीशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. या काळात, कोणतीही समस्या सोडवताना संवाद साधा.कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून वळवण्यासाठी काही विचित्र गोष्टींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात. आठवड्याच्या उत्तरार्धात तुमची बदली एखाद्या नको असलेल्या ठिकाणी होऊ शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: