(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weekly Horoscope 25 November To 01 December 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 25 November To 01 December 2024 : नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 25 November To 01 December 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. काही राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल. नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात तुमच्या आत्मविश्वासात कमतरता दिसून येईल. तसेच, तुमच्या कुटुंब-परिवारात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जाऊ शकतं. तसेच, आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या कामकाजात बदल करणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. तसेच, नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, जर तुम्हाला वाहन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी चांगला योग जुळून आला आहे. या राशीच्या लोकांना मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. त्यामुळे तुम्ही मेहनत करत राहा. ज्या लोकांची परदेशात जाण्याची इच्छा आहे. त्यांचीही इच्छा लवकरच पूर्ण होईल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीचे लोक कोणत्या तरी एका कारणाने सतत चिंतित असतील.यामुळे तुमचं नोकरी-व्यवसायातही मन रमणार नाही. कामाचा वर्कलोड देखील जास्त असल्यामुळे तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या खर्चात अचानक वाढ होईल. यासाठी पैसे जपून खर्च करा. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. पण यासाठी तुमचं आरोग्य सर्वात आधी महत्त्वाचं आहे याचा काळजी घ्या.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांचं नवीन आठवड्यात मन चलबिचल असू शकतं. तुमच्या कामानिमित्त तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. तसेच, तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. अन्यथा नंतर तुम्हाला त्याचा पश्चात्ताप करावा लागू शकतो. तुमचे तुमच्या मित्रांबरोबर वैचारिक मतभेद देखील असू शकतात. या सर्वांशी तुम्हाला डील करावी लागेल.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे.या आठवड्यात तुम्ही मनाने खचून जाल. तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता दिसून येईल. यासाठी जास्तीत जास्त वेळ धार्मिक कार्यात घालवा. धार्मिक स्थळाला भेट द्या. तसेच, योग, मेडिटेशन आणि सकस आहार घ्यायला सुरुवात करा. यामुळे तुमचं मन शांत राहील आणि कामावर तुम्हाला नीट फोकस करता येईल.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
नवीन आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमचं मन प्रसन्न असेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कामात बदल करण्याची गरज आहे. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमची वाहन घेण्याची इच्छा असेल तर ती लवकरच पूर्ण होईल. मित्रांच्या सहकार्याने तुमची सर्व कामे पूर्ण होतील.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा येणारा आठवडा मध्यम फलदायी राहील. आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या कामाच्या ठिकाणी काही बदलांमुळे किंवा अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. घरातही किरकोळ वाद होतील. अशा वेळी तुम्हाला एक-एक गोष्टी मोठ्या समजुतीने आणि शांत मनाने सोडवाव्या लागतील. तुम्हाला घर आणि कामाच्या ठिकाणी सर्वांशी उत्तम समन्वय राखावा लागेल. नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि कामाच्या ठिकाणी संतुलन राखण्यात अडचणी येऊ शकतात. व्यवसायाशी संबंधित लोकांनी घाईत कोणतंही मोठं पाऊल उचलू नये, अन्यथा फटका बसू शकतो.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा हा आठवडा एका चांगल्या बातमीने सुरू होईल. नोकरदार लोकांना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी सर्वांचं पूर्ण सहकार्य मिळेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. जे लोक बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना या आठवड्यात चांगली संधी मिळू शकते. राजकारणाशी संबंधित लोकांना अचानक मोठं पद किंवा जबाबदारी मिळू शकते. जर तुम्ही खूप दिवसांपासून जमीन, इमारत किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळू शकेल.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा हा आठवडा संमिश्र राहील. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी धावपळ करावी लागेल. या काळात डोक्यावर अतिरिक्त कामाचा भार असेल, ज्यामुळे केवळ मानसिकच नाही तर शारीरिक थकवा देखील येईल. नोकरीच्या शोधात असलेल्या किंवा नोकरीत बदलाची अपेक्षा करणाऱ्या लोकांना अजून थोडी वाट पहावी लागेल. आठवड्याच्या शेवटी तुमचे विरोधक सक्रिय होतील आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा स्थितीत तुम्हाला कामाच्या ठिकाणी लोकांच्या छोट्या गोष्टींना महत्त्व न देता तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं लागेल. या आठवड्यात लव्ह लाईफमध्ये थोड्या अडचणी जाणवतील.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मागील आठवड्याच्या तुलनेत नोव्हेंबरचा हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी अधिक शुभ आणि फलदायी ठरेल. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही वाद सुरू असतील तर ते वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने सोडवले जातील. व्यापारी लोकांचे पैसे बाजारातून अनपेक्षितपणे बाहेर येतील. या काळात तुम्ही एखाद्या योजनेत पैसे गुंतवू शकता, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात मोठा लाभ मिळू शकेल. नोकरदार लोक कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण करतील. तुमच्या लव्ह लाईफशी संबंधित समस्या दूर होतील, तुमचं कुटुंब तुमचं नातं स्वीकारू शकेल आणि तुमच्या लग्नाचा विचार करू शकेल. या काळात आरोग्य सामान्य राहील.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांना नोव्हेंबरच्या या आठवड्यात कोणतंही काम घाईने करणं टाळावं लागेल. कामाच्या ठिकाणी कोणतंही काम इतरांवर सोपवण्यापेक्षा स्वतः करणं चांगलं. या आठवड्यात तुमच्यावर दुसऱ्याकडून चुकीचा आरोपही होऊ शकतो, अशा परिस्थितीत अत्यंत सावधगिरीने आणि हुशारीने वागा. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. या काळात वाहन जपून चालवा. व्यवसायाशी संबंधित लोकांनी या काळात पैशाच्या व्यवहारात अत्यंत सावधगिरीने करा, अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमची लव्ह लाईफ टिकवून ठेवायची असेल तर जोडीदाराच्या भावनांच्या काळजी घ्या.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
नोव्हेंबरच्या नवीन आठवड्यात मीन राशीच्या लोकांचं भाग्य उजळेल. जे लोक बऱ्याच दिवसांपासून मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकतं. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी आठवड्याचे मधले दिवस खूप शुभ राहतील. या काळात भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत असतील. आठवड्याच्या शेवटी घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य ठणठणीत राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :