Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 20 To 26 January 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 20 To 26 January 2025 : जानेवारी महिन्याचा चौथा आठवड्यालाही सुरुवात होणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. जानेवारीचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. तुमच्या मुलांबरोबर तुम्हाला चांगला वेळ घालवता येईल. तसेच, आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्याकडून जास्त पैसे खर्च केले जाऊ शकतात. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास. तुम्हाला डोळ्यांशी संबंधित आजार जाणवू शकतो.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. तसेच, तुमचा व्यवसाय चांगला चालेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स मिळतील. तसेच, आठवड्याच्या शेवटी तुमच्या वैयक्तिक जीवनात काही चांगले बदल तुम्हाला पाहायला मिळतील. नवीन वस्तूंची खरेदी कराल.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आव्हानांनी भरलेला असू शकतो. तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात, परंतु तुम्ही संयम राखलात तर सर्व अडचणी सोडवू शकाल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. काही बदलांमुळे तुमच्यावर ताण येऊ शकतो, परंतु तुम्ही ते चांगल्या प्रकारे हाताळू शकता. लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर, लव्ह लाईफमध्ये काही मतभेद असू शकतात, परंतु तुमच्यात परस्पर समंजसपणा वाढेल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शांततापूर्ण राहील. तुमचं लक्ष तुमच्या कामात चांगले परिणाम मिळवण्यावर असेल. तुम्ही काही नवीन कल्पना घेऊन पुढे जाऊ शकता आणि काही सकारात्मक बदल देखील होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. जुनी कामे मार्गी लावण्याची वेळ आली आहे. प्रेमसंबंधांमध्ये आनंद आणि स्थिरता राहील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवू शकाल.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी हा आठवडा यशाचा असेल. या आठवड्यात तुम्ही नवीन योजना आणि कल्पना साकार करू शकाल. करिअर आणि कौटुंबिक जीवनात संतुलन राखणं तुमच्यासाठी हा आठवडा महत्त्वाचा असेल. कामाच्या बाबतीत काही विशेष संधीचा फायदा घेऊ शकता. पण लक्षात ठेवा की विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रेमसंबंधांमध्ये एकमेकांच्या भावनांचा आदर करा. तुमच्या नात्यात गोडवा वाढेल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी हा आठवडा प्रगतीचा असेल. तुम्हाला काही नवीन संधी मिळू शकतात, विशेषत: तुम्ही कोणत्याही कला क्षेत्रात काम करत असाल कर चांगले परिणाम मिळतील. तुमच्या विचारांचं कौतुक होईल. कामाच्या बाबतीत यश मिळेल. काही नवीन प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ शकता. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर समंजसपणा वाढेल. एखाद्या गोष्टीबद्दल तणाव असेल तर तो सोडवला जाऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :