Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 20 To 26 January 2025 : नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 20 To 26 January 2025 : जानेवारी महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायाला चांगली चालना मिळेल. तसेच, राजकारणात तुम्ही सक्रिय असाल. तुम्हाला कुटुंबियांचा चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, आठवड्याच्या मध्यात तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. पोटाशी संबंधित विकार जाणवू शकतात. तसेच, रोजगाराच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिन्याचा पुढचा आठवडा चांगला असणार आहे. तुमचं आरोग्य सामान्य असेल. आठवड्याच्या सुरुवातीला कोणताही निर्णय घेताना भावूक होऊ नका. अन्यथा तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तसेच, जोडीदाराचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्साहाचा असणार आहे. या आठवड्यात तुमच्याकडे कामाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तसेच, तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार होईल. तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. जोडीदाराबरोबर तुम्ही नवीन प्रोजेक्टची सुरुवात करु शकता. अनेक शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुमचा व्यवसाय काहीसा मंद गतीने चालेल. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. जर तुम्हाला नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा आठवडा चांगला असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. निरोगी राहा आणि सकस आहाराचं पालन करा.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला जर तुम्हाला एखाद्या योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमचं आरोग्य चांगलं राहील.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आनंददायी असणार आहे. व्यावसायिक दृष्टीकोनातून हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. लहान मुलांना या काळात अनेक नवीन गोष्टी शिकता येतील. तसेच, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे लवकर पूर्ण होतील. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सावध असणं गरजेचं आहे. ध्यान, योगा करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :