(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weekly Lucky Zodiacs : नवीन आठवड्यात ग्रहांच्या मोठ्या हालचाली; 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, नोकरी-व्यवसायात यशासह होणार बक्कळ धनलाभ
Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : जून महिन्यातील तिसरा आठवडा 5 राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. नवीन आठवड्यात या राशींच्या सुखसोयींत अमाप वाढ होईल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल. या आठवड्याच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या
Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 Lucky Zodiacs : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्तम राहील. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शहाणे व्हा. करिअर आणि व्यवसाय वाढवण्याच्या संधी मिळतील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामात अपेक्षित परिणाम मिळतील. तुमचं आरोग्य उत्तम राहील. जर तुम्ही व्यवसाय केला तर तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल, जे लोक सत्तेशी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी हा काळ उपयुक्त ठरेल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा भाग्याचा असेल, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल, ऑफिसमधील लोक तुमच्या आदेशाचं पालन करतील. जर तुमचा पैसा बराच काळ बाजारात अडकला असेल तर तुम्हाला तो परत मिळेल. आठवड्याच्या मध्यात तुमच्या काही मोठ्या इच्छा पूर्ण होतील.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा तणावमुक्त असेल. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. वडिलोपार्जित संपत्ती तुम्हाला मिळू शकते. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही जोखीम घेऊ शकता, जी तुमच्यासाठी पुढे फायदेशीर ठरेल. नवीन आठवड्यात तुमचा आदर आणि सन्मान वाढेल.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ राहील. करिअर आणि व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल. तुमचा वेळ आणि शक्ती योग्य ठिकाणी गुंतवली तर तुम्हाला फायदा होईल. सरकारकडून तुम्हाला काही मदत मिळण्याची आशा आहे. जर तुम्ही कमिशनवर काम करत असाल तर तुमच्यासाठी नवीन आठवडा खूप शुभ आहे. कुटुंबासोबत तुमचा चांगला वेळ जाईल.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहील. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी ठरेल. तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. आरोग्य आणि नातेसंबंध दोन्ही चांगले राहतील. तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत आनंदाचा वेळ घालवाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :