Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र तूळ राशीत असणार आहे .तसेच,आठवड्याचा मधला आणि शेवटचा दिवस खूप खास असणार आहे.
Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : नवीन आठवडा उद्यापासून सुरु होणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र तूळ राशीत असणार आहे .तसेच,आठवड्याचा मधला आणि शेवटचा दिवस खूप खास असणार आहे. एकूणच मेष ते मीन राशीच्या (Zodiac Signs) लोकांचा आठवडा नेमका कसा असेल जाणून घेऊयात साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope).
मेष साप्ताहिक राशीभविष्य
या आठवड्यात तुमची प्रभावशाली लोकांशी भेट होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. तसेच, तुम्ही कामाला प्राधान्य द्याल. जोडीदाराबरोबर लहानसहान गोष्टींवरून वाद होऊ शकतात. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगला ताळमेळ राहील.
वृषभ साप्ताहिक राशीभविष्य
वृषभ राशीच्या लोकांचा नवीन आठवडा चांगला जाणार आहे. ग्रहांची स्थिती पाहता तुमची अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील. वरिष्ठांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमच्या जोडीदाराला करिअरमध्ये काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी तुमची साथ महत्त्वाची ठरेल. तुमचे आरोग्य चांगले राहील.
मिथुन साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन राशीच्या लोकांचा नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असेल. या काळात तुम्ही करिअरबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे. तरूणांचं मन याआठवड्यात भरकटू शकतं. तसेच, व्यापारी वर्गासाठी आर्थिक स्थिती सामान्य राहील. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे.
कर्क साप्ताहिक राशीभविष्य
कर्क राशीच्या लोकांचा नवीन आठवडा चांगला असणार आहे. पण, तुमच्या वैवाहिक नात्यात काहीसा तणाव जाणवेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या बोलून गोष्टी सोडवता येतील. व्यापारी वर्गाला सरकारी कामात फायदा होईल, जर ते अनेक दिवसांपासून काही कामासाठी प्रयत्न करत असतील तर ती कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत पोटाशी संबंधित समस्यांबाबत सतर्क राहावे, हवामान लक्षात घेऊन अन्न हलके आणि सहज पचणारे अन्न खावे.
सिंह साप्ताहिक राशीभविष्य
सिंह राशीच्या लोकांचा नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. या दरम्यान तुम्ही मित्रांबरोबर सहलीला जाण्याचा बेत आखू शकता. तर, व्यापारी वर्गाला अडकलेले पैसे मिळतील. तसेच काही मार्गाने पैसा हातातूनही सुटेल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमचे वैवाहिक जीवन सामान्य असेल. आरोग्याच्या बाबतीत, डोकेदुखीचा त्रास जाणवेल.
कन्या साप्ताहिक राशीभविष्य
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. जर तुम्ही नोकरी बदलीचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. या आठवड्यात तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात. तसेच, तुमची तब्येत अचानक बिघडू शकते. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा.
तूळ साप्ताहिक राशीभविष्य
तूळ राशीच्या लोकांचा नवीन आठवडा चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अनेक नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. ज्या तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडू शकता. व्यापारी वर्गाबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात पैशाशी संबंधित तसेच वैयक्तिक जीवनात सुधारणा होईल. तरुणांना चांगले प्रस्ताव मिळतील ज्यामुळे त्यांना मानसिक चिंतांपासून आराम मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक सहलीला जाण्याची योजना आखू शकता. सांधेदुखीच्या रुग्णांनी या आठवड्यात काळजी घेणे आवश्यक आहे.
वृश्चिक साप्ताहिक राशीभविष्य
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनी उपजीविकेची नवीन क्षेत्रे शोधायला सुरुवात करावी, कारण यश मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यापारी वर्गाने आपल्या व्यवहारात निष्काळजीपणा करू नये. अन्यथा तुमचे अनेक प्रकारचे आर्थिक, सामाजिक आणि शारीरिक नुकसान होऊ शकते. तरूणांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास घरी तुमच्या लग्नाविषयी चर्चा होऊ शकते. घाईघाईत कोणताही निर्णय घेणे टाळावे. आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे.
धनु साप्ताहिक राशीभविष्य
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा नवीन शिकण्याचा असणार आहे. या काळात तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन काहीतरी शिकण्याचा असणार आहे. या दरम्यान, तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तसेच, तुम्ही रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तुमच्या वागणुकीमुळे तुम्ही अनेक संधी गमावू शकता. आरोग्याची काळजी घ्या.
मकर साप्ताहिक राशीभविष्य
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला विरोधकांपासून सावध व्हावं लागेल. या आठवड्यात तुमच्या भयंकर आळस असेल पण मेहनतीला पर्याय नाही. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, सोपे आणि पचणाऱ्या पदार्थांना प्राधान्य द्या.
कुंभ साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ राशीच्या लोकांचा नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. या आठवड्यात तुम्ही नोकरी बदलीचा विचार करू शकता. तसेच, स्वत:चा नवीन व्यवसाय सुरु करू शकता. कोणतंही नवीन काम हाती घेताना वेळेचं नियोजन करा. अन्यथा तुमच्या कार्यात अडथळे येऊ शकतात. व्यावहारिकपणे काम करण्याची तयारी ठेवा. परदेशातील कामांमध्ये जो काही विलंब झाला असेल त्याला गती मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्याने भांडणे होऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत, ज्या लोकांना संधिवात आहे त्यांना त्रास होऊ शकतो.
मीन साप्ताहिक राशीभविष्य
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात नकारात्मक गोष्टींचा प्रभाव तुमच्यावर होऊ देऊ नका. शैक्षणिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी नवीन आठवडा काही विशेष असणार नाही. तसेच, बदलत्या हवामानानुसार तुमच्या आहारात बदल करण्याची गरज आहे. रागावर नियंत्रण ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :