Weekly Horoscope 09 To 15 September 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 09 September To 15 September 2024 : काही राशींसाठी नवीन आठवडा खास असणार आहे, तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 09 September To 15 September 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. काही राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल. सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. या आठवड्यात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. तसेच, तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. मात्र, आठवड्याच्या शेवटी तुमच्या खर्चात चांगली वाढ होणार आहे. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या वाणीत कठोरता ठेवण्याची गरज आहे. देवीची तुमच्यावर चांगली कृपा असणार आहे. नोकरीत परिवर्तनाचे वारे वाहू लागतील. तसेच, या काळात तुम्ही तुमच्या आहारात बदल करणं गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याचा नवीन आठवडा चांगला जाणार आहे. जर तुम्हाला शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. शैक्षणिक बाबतीत तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा खर्चिक असणार आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींवर तुमचे जास्त पैसे खर्च होतील. मात्र, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. त्यामुळे एक प्रकारे सकारात्मक दृष्टीकोन राहील.या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क असणं फार गरजेचं आहे.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही नवनवीन प्रयोग करून स्वत:ला पडताळू शकता. अनेक नवीन धोरणं स्विकारण्यासाछी तयार राहा. तसेच, पैशांचा जपून वापर करा. विनाकारण पैसे खर्च करू नका.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे न्यायचा असेल तर तुम्हाला सर्वांचा पाठिंबा मिळेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा बदल होऊ शकतो.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
नवीन आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणेल. या आठवड्यात तुमच्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं असू शकतं. या आठवड्यात तुम्ही स्वतःवर पैसे खर्च करू शकता. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा शुभ राहील. नोकरदारांना सहकाऱ्यांची साथ लाभेल.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्याचा असेल. या आठवड्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मित्रांच्या मदतीने तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. या आठवड्यात तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला करिअर आणि बिझनेसशी संबंधित मोठे निर्णय घ्यावे लागतील, जे घेण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. या आठवड्यात तुमच्या मुलांना बढती मिळू शकते. प्रियकरासोबत चांगला वेळ घालवाल.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांची नियोजित कामं या आठवड्यात पूर्ण होतील, त्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. मित्रांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या समस्या सोडवता येतील. जमीन आणि घराशी संबंधित वाद आणि समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र राहील. या आठवड्यात तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर तुमचा शोध संपेल. तुमच्या प्रियकरासोबत सुरू असलेले गैरसमज दूर होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :