एक्स्प्लोर

Weekly Horoscope 07 August to 13 August 2023 : आजपासून सुरु होणारा आठवडा 'या' राशींसाठी चांगल्या संधी घेऊन येणार! वाचा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 07 August to 13 August 2023 : या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 07 August to 13 August 2023 : आजपासून ऑगस्ट महिन्यातला दुसरा आठवडा सुरू झाला आहे. मेष, मिथुन, वृश्चिक राशींसाठी चांगला जाणर आहे. तर, कर्क, कन्या, तूळ आणि धनु राशीसाठी नोकरीच्या अनेक संधी निर्माण होतील. एकूणच 12 राशींचा हा आठवडा कसा असणार आहे? यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला असणार आहे. या आठवडयात तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगतीबरोबरच तुम्हाला भरपूर पैसे मिळतील, तसेच भरपूर पैसे खर्च होतील. न्यायालयीन खटल्यातून मुक्तता मिळेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्ही व्यवसायात प्रगती करण्यास सक्षम नसाल. कोणताही निर्णय घेताना तुम्हाला चिंता, तणाव जाणवेल. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही काही मोठ्या संकटातून बाहेर पडू शकता. तुमच्या करिअर आणि व्यवसायात काही अडथळे असतील तर ते दूर होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदाराच्या गरजेकडे दुर्लक्ष करू नका. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत काहींना अस्वस्थ वाटेल. नवीन गुंतवणुकीचा विचार तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा नवीन आठवडा धावपळीचा असणार आहे. तुम्हाला कोर्टातही जावे लागू शकते. आठवड्याच्या मध्यात तुमच्या तब्येतीत काही प्रमाणात बिघाड होऊ शकतो. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्ही वडिलांचे मत अवश्य घ्या. वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. आठवड्याच्या मध्यात तुमच्या तब्येतीत काही प्रमाणात बिघाड होऊ शकतो. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्ही वडिलांचे मत अवश्य घ्या. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत उत्पन्न वाढेल. पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.  

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जवळच्या लाभांसह दूरचे नुकसान टाळण्याचा आहे. तुम्हाला तुमच्या कामाशी संबंधित प्रवास करावा लागू शकतो.तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशाचा तुमच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. वीकेंडला तुमची एखाद्याशी भांडण होऊ शकते. या गोष्टीपासून दूर राहा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत कुटुंबातील सदस्याच्या कमजोर आरोग्यामुळे तुमचं मन उदास होऊ शकतं. कामात यश मिळेल पण आरोग्याचीही काळजी घ्या.

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा विचारपूर्वक काम करण्याचा आहे. कोणतेही काम घाईगडबडीत करू नका. मस्करी करताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत हे लक्षात ठेवा. आठवड्याच्या मध्यात विनाकारण काळजी करणं तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. सासरच्या लोकांकडून धनलाभ होईल. तुमचे वैवाहिक जीवनही चांगले राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत मित्रांबरोबर काही नवीन कामावर चर्चा होईल. प्रवासाचा योग येऊ शकतो. 

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणारा आहे. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर तुम्हाला लवकरच नोकरीची नवीन संधी मिळू शकते. या आठवड्यात  बाहेरचे अन्न खाऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत कौटुंबिक तणाव असेल पण उत्पन्न चांगले राहील आणि तुम्ही काही खास कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. हा आठवडा तुम्हाला अपेक्षित होता तसाच आहे. या आठवड्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळू शकते. तुम्ही अविवाहित असाल तर लवकरच तुमच्या आयुष्यात कोणीतरी येईल. प्रेम संबंध चांगले राहतील. वैवाहिक जीवनात नातेसंबंध आनंदी राहतील. तुमच्या व्यवसायातही चांगली प्रगती होईल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. कुटुंबात येणाऱ्या समस्यांमुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. कामाच्या ठिकाणी सावध राहा, तुमचे विरोधक तुम्हाला निराश करू शकतात. नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि कामाचा समतोल साधणं गरजेचं आहे. प्रियकराच्या बाबतीत कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. फक्त आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुमचा मानसिक तणाव वाढेल आणि तब्येत थोडीशी बिघडू शकते. खर्चही वाढतील. व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल.

धनु

धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळतील. फक्त वाणीवर संयम ठेवा, त्यामुळे तुमचे कार्य यशस्वी होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह धार्मिक स्थळी जाऊ शकता. आठवड्याच्या मध्यात, नोकरीच्या बाबतीत तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. कौटुंबिक सहकार्य तुमच्याबरोबर राहील. घरात आनंदाचे वातावरण राहील. घरात लवकरच लग्नाची चर्चा सुरू होऊ शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये काही तणाव असेल. उत्पन्न कसे वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित कराल.

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही अनेक समस्यांपासून मुक्त व्हाल. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायात भरभराट होईल त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत नोकरीत काही अडचणी येतील. कौटुंबिक वातावरण काहीसे अशांत असेल, परंतु तुम्ही समजूतदारपणा दाखवाल.

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सतर्कतेचा असणाप आहे. या आठवड्यात तुम्ही कोणताही निर्णय काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे. कारण घाईत घेतलेले निर्णय तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात. नोकरदार महिलांचा सन्मान वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत धार्मिक यात्रा करण्याचा योग येऊ शकतो. वडिलांशी एखाद्या कारणावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल, त्यामुळे लाभाची पूर्ण शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात. त्यामुळे तुमच्या विरोधकांपासून सावध राहा. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. आठवड्याच्या मध्यात चांगला काळ जाईल. व्यवसायात प्रगती दिसून येईल. तुमच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. मुलांशी संबंधित काही चांगली माहिती मिळू शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तब्येतीत चढ-उतार दिसतील आरोग्याची काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 07 August 2023 : मेष, धनु, मकरसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget