Weekly Lucky Zodiacs : नवीन आठवड्यात ग्रहांच्या मोठ्या हालचाली; 'या' 5 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, अचानक धनलाभाचे संकेत
Weekly Lucky Zodiacs 01 July To 07 July 2024 : जुलै महिन्याचा पहिला आठवडा 5 राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या 5 राशींना अनेक सुखसोयी मिळतील आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या
Weekly Horoscope 24 June to 30 June Lucky Zodiacs : जुलै महिन्याचा पहिला आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. 1 जुलैपासून महिन्याच्या सुरुवातीसोबत नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
आजपासून सुरू होणारा नवा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्याचा असेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना लवकरच यश मिळेल. तुम्हाला खूप दिवसांपासून मालमत्ता खरेदी करायची असेल तर तुमचे त्या मार्गातील अडथळे दूर होतील. घरात प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळे आनंदाचं वातावरण राहील. या आठवड्यात ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होईल. तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. हा आठवडा आनंदाचा असेल.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्तम राहील. या आठवड्यात तुमच्या नोकरीशी संबंधित समस्या संपतील. या आठवड्यात तुमचा तुमच्या प्रिय जोडीदाराशी उत्तम समन्वय राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुम्हाला कुठे गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी हा काळ उत्तम आहे.
कन्या रास (Virgo)
नवीन आठवडा कन्या राशीच्या लोकांना यश मिळवून देईल. तुमची नियोजित कामं पूर्ण होतील. या आठवड्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. परदेशात जाऊन करिअर घडवायचं असेल तर सरकारशी संबंधित काही प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीने प्रलंबित असलेली कामं पूर्ण होतील. प्रियकराशी संबंध चांगले राहतील.
मकर रास (Capricorn)
जुलैचा पहिला आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी भाग्याचा ठरेल. तुमची नियोजित कामं पूर्ण होतील. कुटुंबातील लोकांचं सहकार्य तुम्हाला लाभेल. व्यवसायात केलेली गुंतवणूक तुम्हाला नफा देईल. तुमच्या प्रियकरासोबतचे संबंध चांगले राहतील आणि तुम्हाला त्यांच्यासोबत आनंदी वेळ घालवण्याची संधी मिळेल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ फळ देणारा ठरेल. तुम्ही दीर्घकाळ नोकरीच्या शोधात असाल तर तुमची प्रतीक्षा संपेल. या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळू शकेल. नवविवाहितांना संतती सुख मिळू शकतं. तुमचा तुमच्या जोडीदाराशी उत्तम समन्वय दिसेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :