एक्स्प्लोर
Shadashtak Yog 2024 : शनी-मंगळ ग्रह मिळून बनवणार षडाष्टक योग; 2025 आधीच 'या' 3 राशींची होणार चांदी
Shadashtak Yog 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनी आणि मंगळ हे दोन्ही खास ग्रह आहेत. या ग्रहांच्या युतीने षडाष्टक योग जुळून येणार आहे. शनी-मंगळ मिळून काही राशींना लाभ देणार आहेत.

Shadashtak Yog 2024
1/7

मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती आणि शनीला कर्मफळदाता म्हणतात. मंगळ ग्रहाचा परिणाम राशींवर तर होतोच पण जगभरात त्याचा प्रभाव पाहायला मिळतो. तर, शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतात. सध्या शनी कुंभ राशीत स्थित आहे. तर मंगळ कर्क राशीत आहे.
2/7

शनी कुंभ राशीत 29 मार्च 2025 पर्यंत असणार आहे. तर, मंगळ ग्रह 7 डिसेंबर पर्यंत कर्क राशीतून वक्री होणार आणि 21 जानेवारी 2025 पर्यंत याच राशीत असणार आहे.
3/7

मंगळ आणि शनीच्या सहाव्या आणि आठव्या चरणात असल्यामुळे या दरम्यान षडाष्टक योग जुळून येणार आहे.
4/7

शनी-मंगळाच्या षडाष्टक योगाचा लाभ मेष राशीच्या वैवाहिक जीवनावर होणार आहे. त्याचबरोबर, तुमच्या घर-कुटुंबात सुख-समृद्धी येईल. तामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची संधी आहे.
5/7

षडाष्टक योगामुळे तूळ राशीच्या लोकांना आर्थिक समस्येपासून सुटका मिळेल. तसेच, तुम्हाला या काळात ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. तुमची अनेक रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील. तसेच, नशिबाची चांगली साथ मिळेल.
6/7

मंगळ आणि शनीच्या षडाष्टक योगामुळे कुंभ राशीच्या लोकांना विविध क्षेत्रात लाभ मिळेल. तसेच, नोकरी-व्यवसायात तुमची प्रगती होईल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. गुंतवणुकीसाठी हा काळ फार शुभ आहे.
7/7

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 05 Dec 2024 02:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
क्रीडा
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion