(Source: Poll of Polls)
Vastu Tips : घरातील हे फोटो बदलू शकतात तुमचे नशीब, आर्थिक संकटही होईल दूर
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात काही वस्तू ठेवल्या तर त्यातून ऊर्जा मिळते. एवढेच नाही तर काही गोष्टी घरात सकारात्मक परिणाम देखील आणतात. तर चुकीच्या काही गोष्टी घरातील नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.
Vastu Tips : घराची सजावट करत असताना वास्तुशास्त्रानुसार केली पाहिजे. अन्यथा नुकसान होऊ शकते. परतु, वास्तुशास्त्रानुसार घरात काही वस्तू ठेवल्या तर त्यातून ऊर्जा मिळते. एवढेच नाही तर काही गोष्टी घरात सकारात्मक परिणाम देखील आणतात. तर चुकीच्या काही गोष्टी घरातील नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. या नकारात्मक प्रभावामुळे घरात इश्वराची कृपा राहत नाही आणि घरातील सदस्य नेहमी चिंतेत राहतात. आपल्या घरात असलेल्या काही गोष्टी नकारात्मक ऊर्जा आणतात. त्यामुळे त्यांना वेळीच दुरुस्त करण्याची गरज आहे. काही चित्रे लावून घरातील वास्तुदोषही कमी करता येतात. त्यामुळे घर सजवताना वास्तुशास्त्राला विशेष म्हणत्व आहे. जाणून घेऊया कोणत्या प्रकारच्या फोटोमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील सदस्यांचे नशीब उजळते.
वास्तुशास्त्रानुसार घरात फोटो लावा
वास्तुशास्त्रानुसार घरात हसणाऱ्या मुलांचे फोटो किंवा सुंदर फुले लावावीत. कारण हसणारी मुले आणि सुंदर फुले ही जीवनशक्तीचे प्रतीक आहेत. ते लावल्याने घरात सकारात्मक उर्जा येते. वास्तूनुसार घराच्या पूर्व आणि उत्तरेकडील भिंतींवर अशी चित्रे लावणे उत्तम मानले जाते.
तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल तर धनप्राप्तीसाठी घराच्या भिंतींवर कुबेर आणि लक्ष्मीजींचे फोटा लावा. त्यामुळे घरातील पैशाची सतत होणारी अडचण दूर होते. कुबेर आणि लक्ष्मी यांचे फोटो उत्तर दिशेला लावावे.
घराची दक्षिण आणि पूर्व दिशा संपत्तीशी संबंधित आहे. या दिशेला हिरवळ आणि जंगलांचे फोटो लावावेलत. त्यामुळे संपत्ती वाढ होते. इतकेच नाही तर या दिशेला सूर्य, पर्वत यांसारख्या नैसर्गिक दृश्यांची चित्रेही लावता येतील. या चित्रांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.
घराची ईशान्य दिशा कौटुंबिक नात्याशी संबंधित आहे. या दिशेला कौटुंबिक फोटो किंवा पूर्ण फॅमिली फोटो लावल्याने कुटुंबातील नाते दृढ राहते. याबरोबरच नद्या आणि धबधब्यांची छायाचित्रे घरात सकारात्मक वातावरण तयार करतात. परंतु, हे फोटो ईशान्य दिशेला लावावेत.
घराच्या पूर्व दिशेला मुलांचे फोटो लावल्याने मुले अभ्यासात वेगवान होतात आणि त्यांचे भविष्यही उज्ज्वल होते.
तुम्हाला कुटुंबात एकटेपणा वाटत असेल तर तुमच्या खुर्चीच्या मागील बाजूस डोंगराचे चित्र लावा. त्यामुळे तुमचा एकटेपणा नाहीसा होईल.
अन्नपूर्णेचे चित्र स्वयंपाकघरात लावणे शुभ मानले जाते. स्वयंपाकघर आग्नेय कोनात नसेल तर ऋषीमुनींची चित्रे लावावीत, अशी श्रद्धा आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या