Vastu Tips : तुमची प्रत्येक इच्छा होणार पूर्ण, दूर होईल रोगराई, फक्त पंचमुखी हनुमानाचा फोटो 'या' दिशेला ठेवा; जाणून घ्या योग्य वेळ
Vastu Tips : शास्त्रानुसार, भगवान हनुमानाच्या पंचमुखी फोटोला देखील फार महत्त्व आहे. याला साहस आणि भक्ती यांचं प्रतीक मानण्यात आलं आहे.
![Vastu Tips : तुमची प्रत्येक इच्छा होणार पूर्ण, दूर होईल रोगराई, फक्त पंचमुखी हनुमानाचा फोटो 'या' दिशेला ठेवा; जाणून घ्या योग्य वेळ Vastu Tips Panchmukhi Hanuman photo in the house know rules to get rid of vastu dosh Vastu Tips : तुमची प्रत्येक इच्छा होणार पूर्ण, दूर होईल रोगराई, फक्त पंचमुखी हनुमानाचा फोटो 'या' दिशेला ठेवा; जाणून घ्या योग्य वेळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/26/b1880b74e7c876cf9260b48c85f70d8a1721968069933358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vastu Tips For Panchmukhi Hanuman Photo : वास्तू शास्त्रात (Vastu Shastra) प्रत्येक दिशा आणि घरातील प्रत्येक कोपऱ्याचं आपलं वेगळं असं महत्त्व आहे. कोणत्याही वस्तूला (Vastu Tips) योग्य दिशा आणि योग्य वेळी ठेवल्यास, तर घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. त्याचबरोबर घरातील वास्तूदोष देखील दूर होते. वास्तूशास्त्रात भगवान हनुमानाच्या (Lord Hanuman) पंचमुखी फोटोला देखील फार महत्त्व देण्यात आलं आहे. जर तुम्ही घरात पंचमुखी हनुमानाचा (Panchmukhi Hanuman) फोटो लावण्याचा विचार करत असाल तर याची जागा नेमकी कोणती असावी या संदर्भात एकदा वास्तू नियमांविषयी नक्की जाणून घ्या.
पंचमुखी हनुमानाचं महत्त्व (Importance Of Panchamukhi Hanuman)
शास्त्रानुसार, भगवान हनुमानाच्या पंचमुखी फोटोला देखील फार महत्त्व आहे. याला साहस आणि भक्ती यांचं प्रतीक मानण्यात आलं आहे. पण, त्याआधी हे जाणून घ्या की, भगवान हनुमानाचे पाच मुख सर्व दिशेला सकारात्मक ऊर्जा देणारे आहेत. तसेच, पंचमुखी हनुमानाची पूजा केल्याने वाईट शक्तींचा नाश होतो आणि घरात सुख-शांती टिकून राहते. वास्तूशास्त्रात, पंचमुखी हनुमानाला अनेक दोषांपासून मुक्ती मिळवणारा मानण्यात आलं आहे.
'या' दिशेला लावा हनुमानाचा फोटो
वास्तू शास्त्रानुसार, पंचमुखी हनुमानाचा फोटो योग्य दिशेला लावल्यास त्याचा विशेष लाभ मिळतो. जर तुमच्यावर पंचमुखी हनुमानाची कृपा राहावी असं वाटत असेल तर घराच्या मुख्य पूजेच्या ठिकाणी पंचमुखी हनुमानाचा फोटो उत्तर-पूर्व दिशेला लावल्यास विशेष लाभ मिळतो.या दिशेला फोटो लावल्यास वास्तू दोष दूर होऊन घरात सुख-शांती राहते. तसेच, घराच्या दक्षिण दिशेला लावल्यास वास्तूदोष शुभ राहत नसतो. तसेच, हनुमानजीचा बैठी अवस्थेत असलेला फोटो विशेष फलदायी मानण्यात आला आहे.
असं म्हणतात की, दक्षिण दिशेला नकारात्मक शक्तींचा संचार होतो. त्यामुळे जर तुम्ही पंचमुखी हनुमानाचा फोटो जर उत्तर-पूर्व दिशेला लावला तर नकारात्मक ऊर्जेपासून सुटका होते. तर, ज्या लोकांच्या घराचा मुख्य दरवाजा योग्य दिशेला नसेल तर तुम्ही मुख्य घराच्या दारी पंचमुखी हनुमानाचा फोटो लावू शकता. यामुळे वास्तूदोष दूर होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shukra Gochar 2024 : ऑगस्ट महिना 'या' 5 राशींसाठी ठरणार लकी! शुक्र ग्रहाच्या संक्रमणामुळे सुरु होतील 'अच्छे दिन'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)