Laughing Buddha: घरात ‘लाफिंग बुद्धा’ची मूर्ती ठेवताय? आधी जाणून घ्या ‘या’ खास गोष्टी...
Laughing Buddha : घरातील ही लाफिंग बुद्धाची मूर्ती सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. पौराणिक मान्यतेनुसार ही मूर्ती घरी ठेवल्याने अनेक संकटांपासून मुक्ती मिळते.
Laughing Buddha : वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये ‘लाफिंग बुद्धा’चे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. घरातील ही लाफिंग बुद्धाची मूर्ती सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. पौराणिक मान्यतेनुसार ही मूर्ती घरी ठेवल्याने अनेक संकटांपासून मुक्ती मिळते. ज्योतिषी आरती दहिया म्हणतात की, लाफिंग बुद्धानुसार प्रत्येक इच्छेचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. यासोबतच ही मूर्ती घरात योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवणेही महत्त्वाचे आहे. चला तर, लाफिंग बुद्धाच्या या मूर्तीशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया...
* लाफिंग बुद्धाची दोन्ही हात वर असलेली मूर्ती दुकानात किंवा ऑफिसमध्ये ठेवा. यामुळे तुमच्या व्यवसायाशी संबंधित समस्या हळूहळू कमी होतील.
* घरातील नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी ड्रॅगनवर विराजमान लाफिंग बुद्धा घरात ठेवा.
* कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर प्रेम टिकवून ठेवण्यासाठी, हातात वाडगा असलेली लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवा.
* चिनी वास्तुशास्त्र फेंगशुईनुसार लाफिंग बुद्धाची मूर्ती कुठेही ठेवण्याऐवजी मुख्य दरवाजासमोर ठेवावी.
* लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात अशा ठिकाणी ठेवावी, जिथे घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती दिसेल.
* पैशाशी संबंधित समस्या असल्यास घरात पैशांचा गठ्ठा हातात असलेली लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवा.
* अपत्यहीन जोडपे मुलांसोबत खेळतानाची लाफिंग बुद्धाची मूर्ती घरी आणू शकतात. असे केल्याने मूल होण्याची शक्यता निर्माण होते.
* लाफिंग बुद्धाची मूर्ती जमिनीवर ठेवू नये. जमिनीपासून 30 इंच उंचीवर ठेवावी.
* लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात पूर्वेकडे ठेवावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
* लाफिंग बुद्धाच्या मूर्तीचे नाक घराच्या मालकाच्या हाताच्या बोटाइतके असावे.
* वास्तूशास्त्रानुसार लाफिंग बुद्धाची मूर्ती किचन, बेडरूम, डायनिंग रूम किंवा टॉयलेट-बाथरूमजवळ ठेवू नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :