एक्स्प्लोर

Holi 2026 : धुलिवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहणाचं सावट? ग्रहणकाळात धुळवड खेळताना 'ही' घ्या काळजी, पंचांगकर्ते मोहन दाते सांगतात...

Holi 2026 : चंद्रग्रहणाचा सूतक काळ भारतात देखील असणार आहे. त्यामुळे भारतात होळी, तसेच, धुळवड नेमकी कधी साजरी करायची या संदर्भात पंचांगकर्ते मोहन दाते यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे

Holi 2026 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, येत्या 2 तारखेला होळी (Holi 2026) असणार आहे. तर, 3 तारखेला धुळवड म्हणजेच धूलिवंदन असणार आहे. मात्र, यंदा 3 तारखेला चंद्रग्रहण देखील लागणार आहे. त्यामुळे धुलिंवदनाच्या दिवशी होळी साजरी करावी का? चंद्रग्रहणाचा सूतक काळ भारतात देखील असणार आहे. त्यामुळे भारतात होळी, तसेच, धुळवड नेमकी कधी साजरी करायची या संदर्भात पंचांगकर्ते मोहन दाते यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात. 

होलिका दहन कधी करावे?

पंचांगकर्ते मोहन दाते म्हणतात, यावर्षी 2 मार्च 2026 रोजी सोमवारी भद्रा असताना प्रदोष काळात  होलिका दहन करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असून मंगळवारी सूर्योदयापासून वेधकाळ सुरु होणार आहे. वेधकाळात पौर्णिमेचा कुळधर्म, पूजा-अर्चा, अभिषेक करता येईल. देवाला नैवेद्य दाखविता येईल. वेधामध्ये पूजन निषेध नाही. आपणास भोजन निषेध असल्याने नैवेद्य अगदी थोडा करावा. आपण प्रसाद म्हणून अभिषेकाचे तीर्थ घेऊ शकता किंवा एक घास अन्नाचा फक्त वास घेऊ शकता. वृद्ध, अशक्त, आजारी, गर्भवती यांना सकाळी 11 पर्यंत अन्नपदार्थ खाता येतील. गुरुजी किंवा सुवासिनी यांना कोरडा शिधा आणि दक्षिणा देऊन कुळधर्म करता येईल. 

ग्रहणाच्या काळात धुळवड करावी का? 

ग्रहण काळात श्राद्ध देखील सपिंडक करता येईल. त्यावेळेस देखील श्राद्धाचा स्वयंपाक नैवेद्यापुरता करून नंतर तो गाईला द्यावा. ब्राह्मणास शिधा आणि दक्षिणा देणे. अशा प्रकारची कर्मे करता येत असल्याने वेधकाळात धूलिवंदन (धुळवड), रंग खेळणे हे देखील करता येईल. आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून 18:48 पर्यंत ग्रहणाचा पर्वकाल आहे. काही ठिकाणी अगदी थोडावेळ पर्वकाल असल्याने त्यांनी 18:48 नंतर फक्त मोक्षस्नान करावे. ज्यांना 15-20 मिनिटांपेक्षा अधिक पर्वकाळ मिळत आहे त्यांना सूर्यास्तानंतर स्नान करून थोडावेळ जप करून 18:48 नंतर मोक्षस्नान करता येईल.

चंद्रग्रहणाचा कालावधी

वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण फाल्गुन पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी, धुलिवंदनच्या दिवशी होईल. हे चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी दुपारी 2:17 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 7:53 वाजता संपेल, जे कुंभ राशीत होईल. यावेळी ग्रहांची स्थिती काही राशींसाठी लाभदायी ठरु शकते. 

त्यामुळे 3 मार्च 2026 रोजी जरी चंद्रग्रहण असले तरी तुम्ही धुळवड खेळू शकता असे पंचांगकर्ते मोहन दाते सांगतात. 

- मोहन दाते (दाते पंचांग)

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :         

Budh Vakri 2026 : अवघ्या काही तासांतच बुध चालणार वक्री चाल; या 3 राशींचे उघडतील नशिबाचे दार, उद्यापासून सुवर्णकाळ सुरु

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : पैसा, नोकरी, प्रसिद्धी आणि संपत्ती...मार्चचा दुसरा आठवडा भरभराटीचा; वाचा मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
पैसा, नोकरी, प्रसिद्धी आणि संपत्ती...मार्चचा दुसरा आठवडा भरभराटीचा; वाचा मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
Shani Ast 2026 : ना ढैय्याचं सावट, ना साडेसातीचा खतरा! शनिच्या अस्ताने पुढचे 40 दिवस 'या' राशींचा राजेशाही थाट, मालामाल होण्याची सुवर्णसंधी
ना ढैय्याचं सावट, ना साडेसातीचा खतरा! शनिच्या अस्ताने पुढचे 40 दिवस 'या' राशींचा राजेशाही थाट, मालामाल होण्याची सुवर्णसंधी
Horoscope Today 9 March 2026 : आज सोमवारच्या दिवशी 8 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 8 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 9 March 2026 : आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथांच्या कृपेने फलदायी दिवस, आजचे राशीभविष्य वाचा
आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथांच्या कृपेने फलदायी दिवस, आजचे राशीभविष्य वाचा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget