Vastu Shashtra: 'काय करावं.. खूप मेहनत करूनही पैसे टिकत नाहीत?' वास्तुशास्त्रानुसार, 'या' टिप्स फॉलो करा, बक्कळ पैसा येईल!
Vastu Shashtra: आज आम्ही तुम्हाला अशाच काही वास्तु टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद मिळतो.
Vastu Shashtra: जीवनात कधी कधी अशी वेळही येते, जेव्हा आपल्या हाती केवळ अपयशच येते. कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही. अशा वेळी काय करावं? ते समजत नाही. पण आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो केल्यानंतर तुमच्या आयुष्यात यश मिळण्यात मदत होईल, आणि तुमची सर्व कामं पूर्ण होतील, जाणून घ्या...
ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते...
हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते. ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर पैशाच्या मागे धावत राहिली तरी प्रत्येकजण श्रीमंत होत नाही. कारण एकतर उत्पन्न कमी किंवा खर्च जास्त असतात. तर अनेक लोक कर्जाच्या खाली दबले जातात. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला अशाच काही वास्तु टिप्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि आपला आशीर्वाद देते.
देवी लक्ष्मी प्रसन्न होईल, अशी पूजेची खरी वेळ कोणती?
देवी लक्ष्मीची पूजा केल्याने तिचा आशीर्वाद मिळू शकतो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईची पूजा योग्य वेळी केली पाहिजे. लक्ष्मीची पूजा करण्यासाठी संध्याकाळची वेळ सर्वात योग्य आणि शुभ मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार यावेळी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास भरपूर आशीर्वाद मिळतात.
झाडू कसा ठेवायचा?
घरातील घाण साफ करण्यासाठी जरी झाडू वापरला जातो. पण ते कधीही अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे ते नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावे. वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की झाडू ओलांडू नये, यामुळे देवी लक्ष्मीचा अनादर होतो आणि ती दुःखी होते.
घर स्वच्छ ठेवा
घराची स्वच्छता केवळ आपल्या आरोग्यासाठीच महत्त्वाची नाही, तर धार्मिक दृष्टिकोनातूनही स्वच्छता अत्यंत महत्त्वाची मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरांमध्ये स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो. जी घरं स्वच्छ आणि नीटनेटकी नसतात त्या घरांमध्ये लक्ष्मीचा कोप होतो. त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर घर नेहमी स्वच्छ ठेवावे.
'या' फळाची पूजा करा
नारळाला धार्मिक ग्रंथांमध्ये श्रीफळ असेही म्हणतात. कारण देवी लक्ष्मीला ते खूप आवडते. त्यामुळे लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये त्या फळाचा अवश्य ठेवावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. वास्तुशास्त्रातही या उपायाचा उपयोग धनप्राप्तीसाठी केला जातो.
हेही वाचा>>
Hindu Religion: पती-पत्नीच्या 'या' एका चुकीमुळे 'तृतीयपंथीय' मुलाचा जन्म होतो? त्यांचा जन्म कसा होतो? पुराण आणि धर्मग्रंथांत म्हटलंय..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)