Vastu Shashtra: पत्नींनो ऐकलं का? सुख-समृद्धीसाठी पतीच्या कोणत्या बाजूला झोपावं माहितीय? वास्तूशास्त्रात काय म्हटलंय? जाणून घ्या..
Vastu Shashtra: वास्तुशास्त्रात पती-पत्नीच्या झोपण्याच्या दिशा आणि स्थितीला विशेष महत्त्व आहे. यामुळे केवळ वैवाहिक जीवनच सुखी होत नाही तर घरात शांती- समृद्धी देखील राखते.
Vastu Shashtra: पती-पत्नी हे दोघेही एकमेकांच्या आयुष्याचे सोबती असतात. जीवनातील प्रत्येक सुख-दु:ख ते वाटून घेतात. सर्वकाही ठीक सुरू असताना अचानक अशा काही गोष्टी घडतात, ज्यामुळे काम बिघडू लागतात, एकमेकांत वाद होऊ लागतात. जर वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहायला गेलं तर याचा आपल्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो, विशेषत: जेव्हा पती-पत्नीच्या नात्याचा प्रश्न येतो. हे केवळ घराची रचना आणि सजावट एवढ्यापुरते मर्यादित नाही, तर त्यात अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे, ज्या आपल्या वैयक्तिक जीवनात संतुलन आणि आनंद आणि समृद्धी आणण्यास मदत करतात. वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीच्या झोपण्याची दिशा आणि त्यांची झोपण्याची शैलीही महत्त्वाची मानली जाते. योग्य दिशा आणि योग्य ठिकाण वैवाहिक जीवन सुखी बनवते, जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीने कसे आणि कोणत्या दिशेला झोपावे? वास्तुशास्त्रात काय म्हटलंय..
झोपण्याची दिशा आणि पती-पत्नीची खोली
वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीची खोली दक्षिण दिशेला असावी. बेडरूममध्ये एक लाकडी पलंग असावा आणि तो बेड चांगल्या स्थितीत असावा. तुटलेल्या पलंगावर झोपल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे त्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, खोलीत हलके रंग वापरणे शुभ आहे, जे वातावरण शांती आणि सकारात्मकतेने भरते.
पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपावे?
वास्तुशास्त्रानुसार पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपावे. असे मानले जाते की पत्नीने डाव्या बाजूला झोपणे शुभ असते, यामुळे वैवाहिक जीवनात सुख-शांती कायम राहते आणि घरामध्ये समृद्धी वाढते. याशिवाय पतीचे नशीबही त्याला साथ देते, तो दीर्घकाळ जगतो आणि त्याची संपत्तीही वाढते.
धार्मिक महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार, देवी पार्वती भगवान शिवाच्या डाव्या बाजूने अर्धनारेश्वराच्या रूपात प्रकट झाली. या कारणास्तव, हिंदू धर्मात पत्नीला 'वामांगी' म्हटले गेले आहे, जी शरीराच्या डाव्या भागाची जबाबदारी घेते. त्यामुळे प्रत्येक शुभकार्यात पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला स्थान दिले जाते. लग्नाच्या वेळीही वधूला वराच्या डाव्या बाजूला बसवले जाते, जे आता पती-पत्नी असल्याचे दर्शविते, अशा प्रकारे, वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतांनुसार, पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनासाठी आणि कौटुंबिक सुख-समृद्धीसाठी देखील या गोष्टी महत्त्वपूर्ण मानल्या जातात.
हेही वाचा>>
Hindu Religion: पती-पत्नीच्या 'या' एका चुकीमुळे 'तृतीयपंथीय' मुलाचा जन्म होतो? त्यांचा जन्म कसा होतो? पुराण आणि धर्मग्रंथांत म्हटलंय..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)