Vastu Tips : वास्तुदोषांमुळे त्रस्त आहात? करा 'हे' पाच सोपे उपाय
Vastu Tips : वास्तुदोष दूर करण्यासाठी घराचील गोष्टी व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. घरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात.
Vastu Tips : घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घराचील गोष्टी व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. घरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. संपत्ती आणि समृद्धीसाठी घराची स्वच्छता आवश्यक आहे. घरातील नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी घरात वस्तू व्यवस्थित ठेवाव्या लागतात.
घराच्या आग्नेय दिशेला पाण्याने भरलेले मातीचे भांडे ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. घरामध्ये मीठ आणि तुरटी टाकून त्याची पुसणी केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
वास्तु टिप्सनुसार घर स्वच्छ आणि प्रकाशाने भरलेले असावे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होण्यासाठी घराच्या पश्चिम कोनात दिवा लावावा.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रोळी आणि चंदनाने स्वस्तिक चिन्ह लावल्यास त्या घरातील वास्तुदोष दूर होतो. हिंदू धर्मात, स्वस्तिक चिन्हाचा वापर सर्व पूजा आणि धार्मिक विधींमध्ये केला जातो. ज्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह बनवले जाते. त्या घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो.
घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुपाचे दिवे ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. जर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका भांड्यात पाणी ठेवले असेल आणि सकाळी ते पाणी घराबाहेर फेकून द्या. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते.
घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेला दिवा लावणे फायदेशीर ठरते. लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी घर वास्तुदोषांपासून मुक्त असावे. त्यामुळे वास्तूदोष दूर करण्यासाठी घरात स्वच्छता ठेवणे खूप महत्वाचे आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या