Palmistry : हातावरील 'या' रेषा ठरतात अशुभ; दु:ख, दारिद्य, कष्ट यांचे देतात वेळोवेळी संकेत
Unlucky Signs In Hand : हस्तरेषा शास्त्रानुसार कोणते हस्तरेखा त्याच्यासाठी अशुभ असू शकतात हे जर एखाद्या व्यक्तीला माहित असेल तर तो अनेक त्रास आणि समस्यांपासून दूर राहू शकतो.
Unlucky Signs In Hand : हस्तरेषा शास्त्रानुसार, व्यक्तीच्या भविष्यात घडणाऱ्या अनेक घटना जाणून घेता येतात. तसेच हातावरील अनेक रेषा एखाद्याचे भाग्य दर्शवतात तर काही रेषा दुर्दैवाचं कारणही ठरतात. अशा स्थितीत हस्तरेषा शास्त्रानुसार, कोणत्या हस्तरेखा अशुभ असू शकतात हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण याची जर तुम्हाला कल्पना नसेल तर आयुष्यात अनेक संकटं आणि दु:खांना सामोरं जावं लागतं. हातावरच्या या अशुभ रेषा कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
तळहातावर बेट, द्विपचं चिन्ह
हस्तरेषा शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर डोंगरावरच्या बेटाचं चिन्ह असेल तर ते चिन्ह अशुभ असते. किंवा, बेटाला चिन्हांकित करणाऱ्या या रेषांचा त्या व्यक्तीच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होतो. समजा ही खूण गुरू पर्वतावर असेल तर त्याच्या मान-सन्मानाला हानी पोहोचू शकते. याशिवाय त्या व्यक्तीला नोकरीतही अडचणी येऊ शकतात.
तळहातावर आडव्या रेषा
हस्तरेषा शास्त्रानुसार अनामिका वर आडवी रेषा असेल तर ती व्यक्तीसाठी अशुभ असते. हे एखाद्या व्यक्तीचं दुर्दैव सूचित करते. याशिवाय समाजातील प्रतिष्ठाही कमी करते.
तळहातावर काळे डाग
तळहातावर असे चिन्ह असल्यास ते अजिबात शुभ नाही. हे चिन्ह दुर्दैव सूचित करते. एवढेच नाही तर, माणसाच्या आयुष्यात सतत समस्या येत राहतात.
भाग्य रेषेवर तीळ चिन्ह असणे
असे कोणतेही चिन्ह असल्यास ते अशुभ चिन्ह आहे. अशा लोकांना त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एवढेच नाही तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक चणचणही भासू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: