एक्स्प्लोर

Mohini Ekadashi 2024 : 18 की 19 मे मोहिनी एकादशीचा शुभ मुहूर्त नेमका कधी? जाणून घ्या या दिवशी काय करावं आणि काय करू नये?

Mohini Ekadashi 2024 : वैशाख शुक्ल एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले होते, म्हणून या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात.

Mohini Ekadashi 2024 : एकादशी तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. सर्व एकादशीच्या तारखा या भगवान विष्णूला समर्पित आहेत आणि त्यापैकी काही एकादशी (Ekadashi) या विशेष मानल्या जातात. वैशाख महिन्यातील एकादशीचाही यात समावेश आहे. मे महिना सुरु झाला आहे आणि या महिन्यात येणारी दुसरी एकादशी म्हणजे वैशाख शुक्ल एकादशी, अर्थात तिला मोहिनी एकादशी (Mohini Ekadashi) असंही म्हणतात.

ही एकादशी अतिशय विशेष आहे कारण समुद्रमंथनाच्या वेळी अमृत बाहेर पडले तेव्हा भगवान विष्णूंनी राक्षसांपासून वाचवण्यासाठी मोहिनीचे रूप धारण केले. या रूपात भगवान विष्णूने सर्व देवांना अमृत प्यायला फसवले. वैशाख शुक्ल एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले होते, म्हणून या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. या वर्षी मोहिनी एकादशी नेमकी 18 की 19 तारखेला आहे ते जाणून घेऊयात. 

मोहिनी एकादशी 2024 (Mohini Ekadashi 2024)

पंचांगानुसार, वैशाख शुक्ल एकादशी किंवा मोहिनी एकादशी 18 मे रोजी सकाळी 11:22 वाजता सुरू होईल आणि 19 मे रोजी दुपारी 1:50 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार 19 मे ही मोहिनी एकादशी मानली जाईल. 19 मे रोजी मोहिनी एकादशीचे व्रत आणि पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 20 मे रोजी द्वादशी तिथी साजरी केली जाईल. मोहिनी एकादशी व्रताची पारण वेळ 20 मे रोजी सकाळी 05:28 ते 08:12 पर्यंत असेल. 

मोहिनी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये?

मोहिनी एकादशीचा दिवस हा अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी उपवास केला नसला तरी भाताचे सेवन करू नये. एकादशीच्या दिवशी भात खाण्यास मनाई आहे. याशिवाय मांसाहारी पदार्थ, मदयपान पिण्याची चूक करू नका. एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नका किंवा स्पर्श करू नका. एकादशीच्या दिवशी विष्णूप्रिया तुळशीचा उपवास करते, पाणी अर्पण करून आणि तुळशीची पाने तोडून तिचे व्रत मोडले जाते. यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्रोधित होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या जीवनात दारिद्र्य, दुःख येण्याची शक्यता असते. तसेच एकादशीच्या व्रतामध्ये झोपू नये. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Mohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशीला जुळून आले दुर्मिळ योग; 'या' राशींची होणार लखलखाट, नोकरी-व्यवसायासह सर्वत्र मिळणार लाभ

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! पॉवरफुल हंस-बुधादित्य राजयोगांचा डबल धमाका, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! पॉवरफुल हंस-बुधादित्य राजयोगांचा डबल धमाका, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
Horoscope Today 3 August 2026: आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget