Mahalaxmi Yog : मिथुन राशीत बनला चमत्कारी महालक्ष्मी योग; 'या' 3 राशींना होणार अनपेक्षित धनलाभ, ऐषोआरामाचं होणार आयुष्य
Mahalakshmi Yog In Mithun : मिथुन राशीमध्ये मंगळ आणि चंद्राची युती होत असल्यामुळे महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींचं नशीब पालटू शकतं.
Mahalakshmi Yog : नऊ ग्रहांपैकी चंद्र हा एकमेव ग्रह आहे जो सर्वात वेगाने फिरतो. तो एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्राचा 15 दिवस शुभ आणि 15 दिवस अशुभ प्रभाव असतो. जर चंद्राचा कोणत्याही शुभ ग्रहाशी संयोग झाला तर काही राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकतं. त्यात आता चंद्र (Moon) मंगळाच्या (Mars) संपर्कात आल्यामुळे महालक्ष्मी राजयोग (Mahalakshmi Yog) तयार होत आहे.
वैदिक पंचांगानुसार, सध्या मंगळ ग्रह मिथुन राशीत आहे. यासोबतच चंद्र देखील 24 सप्टेंबरला सकाळी 9.55 वाजता मिथुन राशीत प्रवेश करेल आणि 26 सप्टेंबरपर्यंत या राशीत राहील. मंगळ आणि चंद्र एकत्र आल्याने मिथुन राशीत महालक्ष्मी राजयोग निर्माण होईल, ज्याचा काही राशींना अफाट लाभ होणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभासोबतच प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
महालक्ष्मी योगाचा 'या' राशींना मिळणार बंपर लाभ
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांना या काळात अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुम्ही खूप दिवसांपासून करत असलेल्या प्रयत्नांना आता यश मिळेल. तुम्ही या काळात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. घरात सुख-शांती नांदेल. लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक तंगीपासून आराम मिळू शकतो. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत कोणत्याही धार्मिक स्थळी जाऊ शकता. व्यवसायातही तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प किंवा ऑर्डर मिळू शकते. यामुळे तुमचा व्यवसाय आणखी यशस्वी होऊ शकतो.
सिंह रास (Leo)
या राशीच्या लोकांसाठीही महालक्ष्मी योग फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक लाभासोबत तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. या काळात तुमचं जीवन आनंदाने बहरुन जाईल. करिअर क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला बढती मिळू शकते. यासोबतच तुमची व्यवसायातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामंही पूर्ण होऊ शकतात. जीवनात आनंदाची खेळी होऊ शकते. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत चालून येतील. अशा स्थितीत तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.
कुंभ रास (Aquarius)
या राशीच्या लोकांसाठीही महालक्ष्मी योग खूप फायदेशीर ठरू शकतो. कुंभ राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असेल. तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील, यातून तुम्हाला बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. कर्जातूनही सुटका मिळू शकते. करिअरच्या क्षेत्रात तुम्ही करत असलेल्या कामाचं कौतुक होईल. यासोबतच तुमच्यावर काही मोठी जबाबदारीही सोपवली जाऊ शकते. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळू शकते. आरोग्य चांगलं राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :