(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wednesday Transgender Astro Remedy : बुधवारी तृतीयपंथीयांना मागा 'ही' गोष्ट, होईल धनलाभ
Wednesday Transgender Astro Remedy : बुधवारी कोणत्याही तृतीयपंथीयांकडून एक रुपयाचे नाणे मागा. जर त्यांनी आनंदाने तुम्हाला नाणे दिले तर समजा तुमचे नशीब बदलणार आहे.
Wednesday Transgender Astro Remedy : असे म्हटले जाते की पैसा हा मूल्यांशी संबंधित आहे. एखाद्या व्यक्तीकडे जितकी संपत्ती असेल तितकी ती व्यक्ती अधिक सामर्थ्यवान असते. घरातील खराब वास्तूमुळे अनेक वेळा कष्ट करूनही आर्थिक संकट येते. जर तुम्हाला पैशांशी संबंधित समस्या येत असतील तर एक रुपयाचे नाणे या समस्यांवर मात करू शकते.
शास्त्रानुसार तृतीयपंथीयांची प्रार्थना सर्वात प्रभावी मानली जाते. तृतीयपंथीयांना केलेले दान अक्षय पुण्य प्रदान करते. असे मानले जाते की जर पैशाशी संबंधित समस्या असेल तर बुधवारी तुम्ही कोणत्याही तृतीयपंथीयांकडून एक रुपयाचे नाणे मागा. जर त्यांनी आनंदाने तुम्हाला नाणे दिले तर समजा तुमचे नशीब बदलणार आहे. त्यांनी दिलेले नाने हिरव्या कपड्यात गुंडाळा आणि पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा. असे केल्याने कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.
जर तुम्हाला बुधवारी तृतीयपंथीय आढळले तर त्यांना दान द्या. या दिवशी तृतीयपंथीय कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका.
बुधवारी तृतीयपंथीय घरी आले तर त्यांना कपडे दान करा. यामुळे जीवनात सुख-समृद्धी येते. या दिवशी त्यांना हिरव्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्याने बुध ग्रह बलवान होतो. तृतीयपंथीयांना दान देणे ही खूप शूभ गोष्ट मानली जाते. तृतीयपंथीयांनी आर्शीवाद दिल्यास ते खूप लाभदायक असते असे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :