Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाला काही तास उरले असताना महायुती सरकारची खेळी, दि.बा. पाटलांच्या कुटुंबाला VIP पास अन्...
Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज लोकार्पण होत आहे. अशातच नवी मुंबई विमानतळावर लोकनेते दि.बा. पाटलांचं नाव बोर्डवर झळकलं असून हा बोर्ड आता साऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे.

Navi Mumbai Airport: बहुप्रतीक्षित आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वकांक्षी समजल्या जाणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज (8 ऑक्टोबर) लोकार्पण होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Navi Mumbai Airport) यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. विशेष म्हणजे या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नामांकनासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता. त्यासाठी सर्वपक्षीय आंदोलनं आणि मोर्चे काढण्यात आले होते. अखेर राज्य सरकारने लोकनेते दि.बा पाटील (D.B. Patil) यांच्या नावाला मान्यता दिली आहे. अशातच आज नवी मुंबई विमानतळावर लोकनेते दि.बा. पाटलांचं (Navi Mumbai Airport Naming) नाव बोर्डवर झळकलं असून हा बोर्ड आता साऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. तर दुसरीकडे भूमिपूत्राला आज न्याय मिळाला असल्याची भावना नवी मुंबईकरांकडून व्यक्त केली जात आहे.
Navi Mumbai Airport Naming: उद्घाटनाला काही तास उरले असताना महायुती सरकारची खेळी
मिळलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाला काही तास उरले असताना महायुती सरकारने अनोखी खेळी खेळल्याची चर्चा आहे. परिणामी आता जिथे जिथे नवी मुंबई विमानतळाचे साईन बोर्ड आहे तिथे आता दि.बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा कागद चिटकवला जातोय. तर दुसरीकडे दि.बा. पाटील यांची दोन्ही मुलं आणि पत्नी यांना देखील आजच्या सोहळ्याला बोलवण्यात आले आहे. त्यांना व्हीआयपी पास दिल्याची देखील माहिती आहे. तर नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी विमानतळाबाहेर उभारण्यात आलेल्या कमानीवर देखील दि.बा. पाटील यांचं नाव प्रकर्षाने दसून येत आहे. त्याचप्रमाणे तिथे उभारण्यात आलेल्या बोर्डावरही दि.बा. पाटलांचं नाव आहे.
D.B. Patil Navi Mumbai Airport Naming : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटलांचं नाव, बोर्ड झळकले
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या नावाचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या नावाबाबत सकारात्मकता दर्शवली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची मागणी केली होती. मात्र, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथील भूमिपुत्रांनी दि.बा. पाटील यांच्या नावासाठी संघर्ष केला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दि. बा पाटील यांच्या नावाला समर्थन दिले आहे. सध्या विमानतळाच्या ठिकाणी 'लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई' असा अधिकृत बोर्ड लावण्यात आला आहे. डिसेंबरपर्यंत या विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणे सुरू होतील आणि त्यावेळी हे विमानतळ दि.बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ याच नावाने ओळखले जाईल, अशी माहिती आहे.
संबंधित बातमी:



















