Surya Grahan : 2025 वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण कधी लागणार? या दिवशी काय करावं आणि काय करु नये?
Surya Grahan 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 या नव्या वर्षातील पहिलं सूर्य ग्रहण 29 मार्च रोजी लागणार आहे. मात्र, हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही.
Surya Grahan 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यग्रहणाला (Surya Grahan) खगोलीय आणि धार्मिक दृष्टीकोनातून फार महत्त्व आहे. प्रत्येक वर्ष सूर्य आणि चंद्राचे 2-2 ग्रहण असतात. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य ग्रहणाचा काळ शुभ मानला जात नाही. त्याचे काही अशुभ प्रभाव असतात. त्यामुळे व्यक्तीला स्वत:च त्याचा बचाव करावा लागतो.
आता अवघ्या काही दिवसांत 2025 या नव्या वर्षातील पहिलं सूर्य ग्रहण लागणार आहे. यावेळचं ग्रहण खास असणार आहे. कारण याच दिवशी सूर्य पुत्र शनी देव राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे हे सूर्यग्रहण केव्हा असमार आणि या दिवशी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात जाणून घेऊयात.
2025 वर्षातील पहिलं सूर्य ग्रहण केव्हा लागेल?
ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 या नव्या वर्षातील पहिलं सूर्य ग्रहण 29 मार्च रोजी लागणार आहे. मात्र, हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात सूतक काळ लागू होणार नाही. मात्र, या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
सूर्यग्रहणाच्या वेळी हे काय करु नका
धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा सूर्यग्रहण लागते तेव्हा ते कधीच उघड्या डोळ्यांनी बघू नये. कारण यामुळे तुमच्या डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होतो. तसेच, या दिवशी घराबाहेर पडू नका. तसेच, भोजन आणि पाण्याचं सेवन करु नका. या दरम्यान डोक्यावरचे केस आणि नखं कापणं वर्जित मानलं जातं. हे नियम वृद्ध, आजारी आणि लहान मुलं सोडून सर्वांवर लागू आहेत. तसेच, या कालावधीत श्राद्ध देखील करु नये.
सूर्य ग्रहणाच्या वेळी कोणती कामे करावीत?
सूर्यग्रहणाच्या वेळी भगवान विष्णूचे ध्यान करावे. त्याचबरोबर त्यांच्या मंत्राचा जप करावा. या दरम्यान महामृत्युंजय मंत्र आणि गायत्री मंत्राचा जप करणं शुभ मानलं जातं. असे केल्याने आत्मविश्वासात वाढ होते. तसेच, जोपर्यंत सूर्यग्रहण आहे तोपर्यंत या कालावधीत लस्सी, पनीर, दूध, तेल किंवा तुपात केलेल्या जेवणात तुळशीची पानं टाकावीत. यामुळे सूर्यग्रहणाचा अशुभ प्रभाव कमी होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: