Planetary Parade 2025 : प्रजासत्ताक दिनापूर्वीच अवकाशात दिसणार 6 ग्रहांची परेड; काही राशींना लाभ तर 'या' 2 राशींसाठी असणार धोक्याची घंटा
Planetary Parade 2025 : खगोलीय घटना आणि सौरमालेत 25 जानेवारी रोजी संध्याकाळी ग्रहांची परेड होणार आहे. या दरम्यान 6 ग्रह एकाच रांगेत दिसून येणार आहेत.
Planetary Parade 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या सौरमालेत सर्व ग्रह एकाच रांगेत येणं फार दुर्लभ आणि अद्भूत मानलं जातं. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त ग्रहांची रांग एकाच रांगेत येते तेव्हा त्याला 'ग्रहांची परेड' किंवा 'प्लॅनेट परेड' असं म्हणतात. ही फार अद्भूट घटना मानली जाते. याचसाठी 25 जानेवारी 2025 चा दिवस फार खास मानला जाणार आहे. कारण या दिवशी आपल्याला आकाशात अद्भूत ग्रहांचं दृष्य पाहायला मिळणार आहे. ग्रहांची ही परेड नेमकी कधी आणि कशी तुम्ही पाहू शकता. तसेच, याचा कोणत्या राशींवर परिणाम होऊ शकतो. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
25 जानेवारीला होणार 6 ग्रहांची परेड
खगोलीय घटना आणि सौरमालेत 25 जानेवारी रोजी संध्याकाळी ग्रहांची परेड होणार आहे. या दरम्यान 6 ग्रह एकाच रांगेत दिसून येणार आहेत. हजारो वर्षांनंतर हे दृष्य दिसणार आहे. तसेच, ज्योतिष शास्त्रानुसार, 6 ग्रह एका रांगेत आल्यामुळे सर्व 12 राशींवर याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. मात्र, या दरम्यान 2 राशी अशा आहेत ज्यांच्यावर फार वाईट परिणाम होऊ शकतो. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
'या' राशींवर होणार सर्वात वाईट परिणाम
ग्रहांच्या या परेडचा सर्वात वाईट पिरणाम कुंभ आणि मीन राशींच्या लोकांवर होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना या काळात सावध राहण्याची गरज आहे. तसेच, या काळात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक ताण जाणवू शकतो. तसेच, आर्थिक संकटांचा सामना देखील करावा लागेल. त्यामुळे या दिवशी काही उपाय केल्याने तुमच्या या समस्या दूर होऊ शकतात.
'हे' करा उपाय
- ग्रहांच्या परेडच्या दरम्यान कुंभ आणि मीन राशींच्या लोकांनी कोणत्याच वादात पडू नये.
- वाहन चालवताना काळजी घ्या.
- कोणाशीही खोटं बोलू नका.
- तसेच, काळ्या कापडात उडदाची डाळ बांधून दान करा.
- तसेच, गरजूंना अन्नदान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: