Surya Grahan 2025 : सूर्यग्रहणाच्या दिवशी 'ही' 3 कामं नक्की करा; राहू-केतूच्या अशुभ परिणामांपासून मिळेल मुक्ती, धनसंपत्तीत भरभराटीचे संकेत
Surya Grahan 2025 : पौराणिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या दिवशी राहू-केतूचा विशेष प्रभाव पाहायला मिळणार आहे. या दिवशी काही उपाय केले तर राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते.

Surya Grahan 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण (Surya Grahan 2025) यंदा 21 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी सर्वपित्री अमावस्या देखील आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात याचा सूतक काळ लागू होणार नाही. मात्र, आध्यात्मिक दृष्टीकोनाच्या दृष्टीने काही सावधानता आणि उपाय पाळणं गरजेचं आहे.
पौराणिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या दिवशी राहू-केतूचा विशेष प्रभाव पाहायला मिळणार आहे. या दिवशी राहू-केतू ग्रह सक्रिय असणार आहेत. त्यामुळे असं म्हणतात की या दिवशी काही उपाय केले तर राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. यासाठीत सूर्यग्रहणाच्या दिवशी काय करावं ते जाणून घेऊयात.
सूर्यग्रहणानंतर स्नान आणि दान करावं
सूर्यग्रहणानंतर पवित्र नदीत स्नान करणं अत्यंत पुण्यदायी ठरेल. जर तुमच्याजवळ नदी नसेल तर घरातच पाण्यात गंगाजल घालून स्नान करा. त्यानंतर तुमच्या क्षमतेनुसार, गरिबांना दान द्या. यावेळी चणे, गहू, तांदूळ, गूळ, डाळी, लाल वस्त्र तसेच, काही आवश्यक वस्तू गरीबांना दान दिल्यास शुभ मानले जाते. यामुळे राहू-केतूच्या अशुभ प्रभावांपासून मुक्ती मिळते.
तुळशीशी संबंधित उपाय (Tulsi Remedies)
हिंदू मान्यतेनुसार, ग्रहणाच्या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो. यासाठी तुळशीच्या पानांचा उपयोग करु शकता. सूर्यग्रहणाच्या दिवसी खाण्या-पिण्याच्या वस्तूमध्ये तुळशीची पाने घालून भोजन करणं अपवित्र नसणार.
मंत्र जाप आणि ध्यान (Mantra Jaap and Meditation)
ग्रहणकाळात पारंपारिक पूजा-पाठ करु नये. मात्र, या काळात भगवान विष्णूचं ध्यान करावं. तसेच, मंत्रजाप करणं अत्यंत लाभदायी आहे. तसेच, महामृत्यूंजय मंत्राचा देखील जप करावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















