Surya Gochar 2025 : ग्रहांचा राजा सूर्याचा राहूच्या नक्षत्रात होतोय प्रवेश; 'या' राशींच्या लोकांनी ताकही फुंकून प्यावं, नोकरीवर होणार परिणाम?
Surya Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य आर्द्रा नक्षत्रात 22 जून ते 6 जुलैपर्यंत असणार आहे. यामुळे अनेक राशींवर परिणाम होणार आहे.

Surya Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य (Sun) एका ठराविक कालावधीनंतर नक्षत्र परिवर्तन करतात. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. ग्रहतालिकेत सूर्याला पिता, मान-सन्मान आणि आत्म्याचा कारक मानला जातो. त्यामुळे जर सूर्याच्या स्थितीत बदल झाला तर त्याचा परिणाम अनेक क्षेत्रावर होतो.
सध्या सूर्य मिथुन राशीत विराजमान आहे. तर, नक्षत्राच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, सध्या सूर्य मृगशिरा नक्षत्रात विराजमान आहे. 22 जून रोजी सकाळी 6 वाजून 28 मिनिटांनी सूर्य मृगशिरा नक्षत्रातून निघून आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्याच्या पापी राहू नक्षत्रात प्रवेश केल्याने अनेक राशींच्या अडचणीत वाढ होऊ शकते. त्यामुळे या राशींना सावधानतेची गरज आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य आर्द्रा नक्षत्रात 22 जून ते 6 जुलैपर्यंत असणार आहे. यामुळे अनेक राशींवर परिणाम होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांना या काळात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीवर देखील परिणाम होईल. तुमच्या कुटुंबात तणावाचं वातावरण निर्माण होईल. तसेच, तुमच्या मानसिक स्थितीवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या काळात कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घेण्याची गरज आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्याचं आर्द्रा नक्षत्रात होणारं संक्रमण सूर्य राशीच्या लोकांसाठी फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला धनहानीचा सामना करावा लागणार आहे. तसेच, या काळात कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे. तुमची या काळात चिडचिड होईल.
मीन रास (Pisces Horoscope)
सूर्याच्या आर्द्रा नक्षत्रात प्रवेश केल्याने मीन राशीच्या चतुर्थ चरणात अनेक हालचाली पाहायला मिळतील. कुटुंबात सतत तणावाचं वातावरण पाहायला मिळेल. त्यामुळे या काळात कोणत्याही वाद-विवादापासून दूर राहा. तसेच, कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















