(Source: ECI | ABP NEWS)
Shadashtak Yog 2025 : सावधान! षडाष्टक योगाचं काऊंटडाऊन सुरु; पुढील 24 तास 'या' राशींसाठी भयंकर त्रासाचे, शनि-मंगळ करणार हाल
Shadashtak Yog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या 20 जून रोजी म्हणजेच उद्या शनी-मंगळ ग्रहाच्या चालीमुळे षडाष्टक योग जुळून येणार आहे. हा योग तीन राशींवर खूप भारी पडणार आहे.

Shadashtak Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या चालीला फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. ग्रह-नक्षत्रांच्या चालीमुळे व्यक्तीची प्रगती, त्याचं भाग्य नेमकं कसं आहे याचा अंदाज लावता येतो. ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या 20 जून रोजी म्हणजेच उद्या शनी-मंगळ ग्रहाच्या चालीमुळे षडाष्टक योग (Shadashtak Yog) जुळून येणार आहे. हा योग तीन राशींवर खूप भारी पडणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
षडाष्टक योगाचा परिणाम वृषभ राशीच्या लोकांवर होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. यासाठी वेळोवेळी सावध राहा. नोकरदार वर्गातील लोकांना देखील कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या मानसिक स्थितीत बदल होईल.
कर्क रास (Cancer Horoscope)
या दोन ग्रहांची युती झाल्याने कर्क राशीच्या अडचणीत वाढ होऊ शकते. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये अनेक समस्या येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर एखाद्या गोष्टीवरुन वाद होऊ शकतात. तसेच, तुमचा दिर्घकालीन आजार पुन्हा वर डोकावू शकतो.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक ठरु शकतो. तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. यासाठी विनाकारण पैसे खर्च करु नका. वैवाहिक जीवनात देखील अडथळे येऊ शकतात. उत्पन्नाचे स्त्रोत घटतील. या काळात कोणतीच जोखीम महत्त्वाची हाती घेऊ नका.
मकर रास (Capricorn Horoscope)
षडाष्टक योगाच्या दरम्यान पैशांच्या बाबतीत या राशीच्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. त्यामुळे कोणालाही पैसे उधारी देऊ नका. तसेच, कोणाकडूनही पैसे घेऊ नका. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल नाही. तसेच, विवाहितांसाठी देखील हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत सावधानता बाळगण्याची गरज आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची संधी आहे. या काळात कोणत्याही यात्रेला जाण्यास टाळा. अन्यथा तुमच्याबरोबर दुर्घटना घडू शकते. तुम्हाला सतत एखादी चिंता सतावेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















