(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Surya Gochar 2024 : तब्बल 50 वर्षांनंतर सूर्य आणि मंगळ ग्रहाचा अद्भूत योग; 'या' 3 राशींची होणार चांदीच चांदी
Surya Gochar 2024 : 20 ऑक्टोबर रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह आपल्या नीच राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ आणि सूर्य हे दोन्ही ग्रह तब्बल 50 वर्षांनतर एकत्र येणार आहेत.
Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, एक ठराविक राशीचक्र पूर्ण केल्यानंतर सर्व ग्रह एका ठराविक अंतराने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. जेव्हा एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्या दरम्यान ग्रहांचा अद्भूत संयोग जुळून येतो. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्याने नुकताच
तूळ राशीत प्रवेश केला आहे.
या व्यतिरिक्त 20 ऑक्टोबर रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह आपल्या नीच राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ (Mars) आणि सूर्य (Sun) हे दोन्ही ग्रह तब्बल 50 वर्षांनतर नीच होणार आहेत. याचा प्रभाव काही राशींवर सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक होणार आहे. यामुळे कोणत्या राशींचं उजळू शकतं ते जाणून घेऊयात.
तब्बल 50 वर्षांनंतर जुळून येणार अद्भूत संयोग
ज्योतिष शास्त्रानुसार, तब्बल 50 वर्षांनतर हा अद्भूत संयोग जुळून येणार आहे.
ग्रहांचा राजा सूर्याने 17 ऑक्टोबर रोजी आपल्या नीच राशीत म्हणजेच तूळ राशीत प्रवेश केला आहे. त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रह नीच राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे. याचा प्रभाव 3 राशींव होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ होईल. तसेच, करिअरसंबंधित सर्व अडचणी दूर होतील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुमच्या साहस आणि पराक्रमात चांगली वाढ होईल. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. तुमच्या भौतिक सुख-समृद्धीत वाढ झालेली दिसेल. त्याचबरोबर तुम्ही एखादी प्रॉपर्टी देखील खरेदी करु शकता. परदेशात जाण्याचा योग आहे. वैवाहिक जीवन सुखी असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :