Shani Dev : दिवाळीनंतर शनीची मार्गी चाल! मेषसह 'या' राशींवर होणार साडेसातीचा परिणाम, एकामागोमाग वाढतील अडचणी
Shani Dev : 15 नोव्हेंबर रोजी शनी मार्गी होणार आहे. शनीच्या या संक्रमणामुळे अनेक राशींवर प्रभाव होणार आहे.
Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) कर्मफळदाता म्हणतात. शनी (Lord Shani) प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतात. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, दिवाळीनंतर (Diwali 2024) म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी शनी मार्गी होणार आहे. शनीच्या या संक्रमणामुळे अनेक राशींवर प्रभाव होणार आहे. 29 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री स्थितीत होते. ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह सरळ चाल चालतात तेव्हा त्याला मार्गी होणं असं म्हणतात. याशिवाय शनी जर उलट्या चालीने चालत असतील तर त्यास शनीची वक्री चाल म्हणतात. 2025 मध्ये शनी राशी परिवर्तन करणार आहे. या दरम्यान शनी कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करणार आहे.
शनी कुंभ राशीत राहून मार्गी झाल्याने कोणत्या राशींवर कोणता परिणाम होणार आहे हे जाणून घेऊयात. शनीच्या साडेसातीचा कोणत्या राशींवर (Zodiac Signs) परिणाम होणार आहे हे जाणून घेऊयात.
मकर रास (Capricorn Horoscope)
15 नोव्हेंबरला शनी मार्गी झाल्यामुळे मकर राशीच्या लोकांची आर्थिक चांगली राहणार नाही. तुम्हाला पैशांच्या संबंधित अनेक समस्या जाणवतील. तसेच, या काळात कोणतीही नवीन वस्तू खरेदी करु नका. अन्यथा तुम्हाला तोटा होईल.
मेष रास (Aries Horoscope)
शनीच्या मार्गी झाल्यामुळे मेष राशीच्या लोकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. या राशीत शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरु आहे. त्यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात. तसेच, उत्पन्न कमी होऊ शकते. नोकरीत संघर्ष करावा लागू शकतो.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये कुंभ राशीच्या लोकांच्या साडेसातीचा अंतिम चरण सुरु आहे. त्यामुळे या दरम्यान कामाच्या ठिकाणी तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुमच्यावर कामाच्या अधिक जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. तसेच, मित्रांबरोबर तुमचे वाद वाढू शकतात.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांवर साडेसातीचा दुसरा चरण सुरु होणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्यावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तुमची आर्थिक स्थिती ढासळू शकते. तसेच, व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :