Surya Gochar 2024 : तब्बल 1 वर्षानंतर सूर्याचा सिंह राशीत प्रवेश; 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होणार
Surya Gochar 2024 : सूर्याच्या शुभ प्रभावाने काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरीत प्रमोशन होऊन पगारात घसघशीत वाढ देखील होईल.
Surya Gochar 2024 : ग्रहांचा राजा सूर्य हा सरकारी नोकरी, आत्मविश्वास, पद-प्रतिष्ठा, पिता आणि सन्मानाचा कारक मानला जातो. अशा स्थितीत सूर्य (Sun) जेव्हा आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव 12 राशींसह देश आणि जगावर पडतो. अशातच ग्रहांचा राजा असलेल्या सूर्य ग्रहाचं त्याच्या स्वराशीत, म्हणजेच सिंह राशीत संक्रमण होत आहे, जे काही राशींसाठी फार शुभ मानलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार, 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7:53 वाजता सूर्य देव सिंह राशीत प्रवेश करेल. यानंतर 16 सप्टेंबरपर्यंत या राशीत राहील आणि नंतर कन्या राशीत प्रवेश करेल. सूर्य स्वत:च्या राशीत गेल्याने 3 राशींना (Zodiac Signs) खूप फायदा होणार आहे.
तूळ रास (Libra)
या राशीमध्ये अकराव्या घरात सूर्य प्रवेश करणार आहे. या घराला नफ्याचं घर म्हणतात. सिंह राशीत सूर्याचं आगमन या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतं. या राशीच्या लोकांचा एक महिन्याचा काळ चांगला जाईल, त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होतील. तुम्हाला तुमच्या वडिलांचं आणि गुरूंचं पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकाल. तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
धनु रास (Sagittarius)
या राशीतील भाग्याच्या घरात सूर्य प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमची परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना यश मिळू शकतं. यासोबतच परदेशात नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांना भरपूर नफा मिळू शकतो. विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ आता त्यांना मिळणार आहे. वाहन व मालमत्ता खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही तुमच्या मेहनतीच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर कामाच्या ठिकाणी स्वतःसाठी एक वेगळं स्थान निर्माण करू शकाल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचं भ्रमण फायदेशीर ठरू शकतं. सूर्य या राशीच्या चढत्या घरात प्रवेश करणार आहे, अशा स्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरी आणि व्यवसायात मोठ्या यशासोबतच तुम्हाला भरपूर नफाही मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नेतृत्व क्षमता वाढेल, ज्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमचं स्थान निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकता. या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. आरोग्य चांगलं राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: