एक्स्प्लोर
Srawan 2022 : श्रावण शनिवारी करा 'हा' उपाय, उजळेल भाग्य
Srawan 2022 : श्रावण महिन्यात भगवान शंकराची आराधना केल्याने भक्तांना इच्छित फळ मिळते. तसेच त्यांच्या आशीर्वादाने आनंदी जीवन जगता येते.
Srawan 2022 : येत्या 29 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. असे म्हटले जाते की, श्रावण महिन्यात भगवान शंकराची आराधना केल्याने भक्तांना इच्छित फळ मिळते. तसेच त्यांच्या आशीर्वादाने आनंदी जीवन जगता येते. श्रावणातील सोमवारप्रमाणेच शनिवारचेही खूप महत्त्व आहे.
शनिदेवाचा हा उपाय शनिवारी केल्याने भगवान शंकराचा आशीर्वादही मिळतो अले म्हटले जाते. भगवान शंकराच्या कृपेने शनिदेवाचा कोणताही दुष्प्रभाव होत नाही. ज्या लोकांवर शनीची साडेसाती आणि धैय्याचा कोप असतो त्यांनी श्रावण शनिवारी हे उपाय करावेत.
- शनिवारी करवंदाच्या झाडाचे दर्शन घेऊन करून त्याच्या मुळास पाणी अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या करिअरशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम लवकर पूर्ण होईल, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
- शनिवारी भरणी नक्षत्रात स्नान करून आई-वडिलांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या आणि मंदिरात जाऊन 51 कापसाचे दान करा. असे केल्याने सांसारिक सुख प्राप्त होते असे म्हणतात.
- शनिवारी पाण्यात थोडे दही टाकून स्नान करा आणि मंदिरात जाऊन कापूर दान करा. हे उपाय केल्याने तुम्ही तुमच्या वागण्याने कोणालाही प्रभावित करू शकाल.
- श्रावण महिन्यातील कोणत्याही शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. या दिव्यात तीळ टाका.
- श्रावण शनिवारी काळ्या कुत्र्याला चपाती खायला दिल्यास कुंडलीतील राहू-केतूशी संबंधित दोष दूर होतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
राजकारण
Advertisement