Somvati Amavasya 2024: उद्याची सोमवती अमावस्या अनेकांचं नशीब बदलणार? 'हे' शुभ योग बनवणार मालामाल, पितरांचे आशीर्वाद मिळणार
Somvati Amavasya 2024: वर्षातील शेवटच्या अमावस्येला काही गोष्टींचे दान केल्यास येणाऱ्या वर्षात तुम्हाला तुमच्या पितरांचे आणि देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील.
Somvati Amavasya 2024: सोमवारी येणारी सोमवती अमावस्या ही 2024 वर्षातली शेवटची अमावस्या असणार आहे, ही अमावस्या खऱ्या अर्थाने अनेकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. हिंदू धर्मात या अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात येणाऱ्या विशेष तिथींवर दानधर्म केल्यास अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते. सोमवती अमावस्या विशेषत: पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आणि पुण्य कर्म करण्याचा दिवस मानला जातो. तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करायची असेल किंवा येणारं वर्ष 2025 चांगलं हवं असेल, तर काही उपाय अवश्य करावेत किंवा या गोष्टी दान करा, जेणेकरून येणाऱ्या वर्षात तुम्हाला तुमच्या पितरांचे आणि देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील.
2024 ची शेवटची अमावस्या कधी आहे?
मार्गशीर्ष अमावस्या तिथी 30 डिसेंबर रोजी पहाटे 4.01 वाजल्यापासून सुरू होईल आणि 31 डिसेंबर रोजी पहाटे 3:56 पर्यंत चालेल. उदयतिथीच्या निमित्ताने पौष अमावस्या हा सण ३० डिसेंबरलाच साजरा केला जाणार आहे. या दिवशी सूर्योदयाची वेळ सकाळी 7:13 आहे.
शुभ योग : 30 डिसेंबर रोजी सकाळपासून रात्री 8.32 पर्यंत वृद्धी योग राहील. या शुभ योगात जी काही इच्छा दान केली जाते, ती पूर्ण होण्यास वेळ लागत नाही असे मानले जाते.
सोमवती अमावस्येला या वस्तूंचे दान करा
- पौष महिन्यातील अमावस्या तिथीला चांदीचे दान करा.
- चांदीचा संबंध चंद्राशी आणि चंद्राचा संबंध मनाशी आहे. त्यामुळे चांदीचे दान केल्याने मन शांत होते आणि आर्थिक स्थिती सुधारते.
- या दिवशी चांदीचे दान केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे संकट दूर होतात.
- पूर्वी आर्थिक परिस्थिती चांगली होती पण आता ती बिघडत चालली आहे, त्यामुळे भुकेल्या लोकांना जेवण द्यावे.
- हिंदू धर्मात हे अत्यंत पुण्यपूर्ण कार्य मानले जाते. यामुळे पितृदोषही दूर होतो आणि उत्पन्नाचे मार्ग खुले होतात.
- या दिवशी गरजूंना कपडे दान केल्याने देवाच्या ऋणातून मुक्ती मिळते.
- जर तुमचे देव तुमच्यावर प्रसन्न असतील तर तुमचे शत्रूसुद्धा तुमचे काहीही हाल करू शकणार नाहीत.
- तांदूळ, गहू, जव, काळे हरभरे, पांढरे तीळ, मूग डाळ, मका किंवा मसूर या सात प्रकारचे धान्य दान करणे देखील शुभ मानले जाते.
- तुम्हाला सर्वत्र चांगली बातमी मिळू लागते.
हेही वाचा>>>
Somvati Amavasya: 30 डिसेंबला 'या' 4 राशींचं नशीब उजळणार! सोमवती अमावस्येला दुर्मिळ योगायोग, चांगले दिवस येतील, भोलेनाथ होणार प्रसन्न!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )