Shukra Gochar 2022 : उद्यापासून 'या' राशींना मिळेल देवीचा आशीर्वाद
Shukra Gochar 2022 : शुक्राच्या राशी बदलाचा लोकांवर सकारात्मक परिणाम होईल. यामुळे नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि काही विशेष राशींवर लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होईल.
Shukra Gochar 2022 : वेळेच्या गणनेनुसार यावेळी शुक्र ग्रह सोमवारी 23 मे रोजी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करत आहे. या राशीत शुक्र 27 दिवस राहिल. शुक्राच्या राशी बदलाचा लोकांवर सकारात्मक परिणाम होईल. यामुळे नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि काही विशेष राशींवर लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होईल. एक महिन्यासाठी या राशीच्या लोकांचे तारे उच्च स्थानावर राहतील. ग्रहांच्या राशीतील बदलांचा लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. अशावेळी लोकांनी अत्यंत संयमाने काम करावे.
सिंह : शुक्राच्या संक्रमणाचा सिंह राशीच्या लोकांवर अनुकूल परिणाम होईल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित यश मिळेल अशी अपेक्षा आहे. वाणीवर संयम ठेवा. लोकांशी संबंध चांगले राहण्याची शक्यता आहे.
मकर : मकर राशीच्या लोकांवरही शुक्राच्या संक्रमणाचा खूप चांगला प्रभाव पडेल. त्यांना नवीन वाहनाचा आनंद मिळू शकतो. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. हा काळ त्यांच्यासाठी खूप अनुकूल आहे. परंतु, त्यांना संयमाने काम करावे लागेल.
मिथुन : शुक्राच्या राशीतील बदलाचा मिथुन राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होईल. त्यांची संपत्ती, कीर्ती आणि वैभव वाढेल. करिअरमध्ये यश मिळेल. त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अचानक धनप्राप्ती होऊ शकते, एखादे रखडलेले काम पूर्ण झाल्यामुळे मानसिक शांती मिळेल.
मेष : शुक्राच्या संक्रमणाचा मेष राशीच्या लोकांवरही सकारात्मक परिणाम होईल. त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा राहील. त्यांना त्यांच्या कारकिर्दीत अपेक्षित यश मिळेल अशी अपेक्षा आहे. शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीची शक्यता आहे. त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यशही मिळेल.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांवर 1 महिना शुक्राच्या संक्रमणाचा अनुकूल प्रभाव राहील. त्यांना नवीन नोकरी मिळू शकते किंवा नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हे देखील वाचा