Shravan Somvar Vrat 2022: श्रावणाच्या 'या' सोमवारी, शिव आणि विष्णूची होईल एकत्र कृपा! जाणून घ्या पूजेची वेळ, पद्धत
Shravan Somvar Vrat 2022 : श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी एक अद्भूत योगायोग घडत आहे.
Shravan Somvar Vrat 2022 : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी या महिन्यात ठिकठिकाणी रुद्राभिषेक केला जातो. शिव मंदिरात दूध आणि पाण्याने अभिषेक केले जाते. भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणात केला जातो. या दिवसांत प्रत्येक मनुष्य आपल्या श्रद्धेनुसार लोकांना दान देतो. श्रावण महिन्यात कावड खांद्यावर घेत भक्त गंगा नदीचे पाणी शिवमंदिरात घेऊन येतात, आणि भगवान भोलेनाथाचा जलाभिषेक करतात. श्रावण महिन्यात भक्त श्रद्धेच्या आणि भक्तीच्या सागरात डुंबून राहतो. दरम्यान, श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी एक अद्भूत योगायोग घडत आहे. या दिवशी व्रत पाळल्यास भक्तांना भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचे एकत्र आशीर्वाद प्राप्त होतात.
कधी सुरू होतोय उत्तर भारतात श्रावण महिना?
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. हा महिना पवित्र महिना मानला जातो. भगवान शंकराला अर्पण असलेल्या या महिन्यात शंकराची विशेष पूजा केली जाते. श्रावण महिन्यात दर सोमवारी व्रत केले जाते. तसेच संपूर्ण महिन्यात शिवमंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चा केली जाते. शंकर देवाला जल अर्पण करून तसेच व्रत वैकल्य करून श्रावण महिन्यात पुण्य कमावता येते. उत्तर भारतात 14 जुलैपासून पवित्र श्रावण महिना सुरू होत असून तो 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यावेळी श्रावण मध्ये एकूण ४ सोमवार येत आहेत. अविवाहित मुलींसाठी श्रावणी सोमवार खूप खास मानला जातो.
हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण हा पाचवा महिना
तर उत्तर भारत वगळता श्रावण मास हा 29 जुलैपासून सुरू होत आहे, आणि श्रावणाचा शेवटचा दिवस 27 ऑगस्ट रोजी येत आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण हा पाचवा महिना असतो
श्रावणी सोमवारचा योगायोग
श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी एक अद्भूत योगायोग घडत आहे. श्रावण महिन्याचा चौथा सोमवार 8 ऑगस्ट रोजी येत आहे. एकादशीही याच दिवशी असते. या एकादशीला पवित्र एकादशी असेही म्हणतात. या दिवशी व्रत पाळल्यास भक्तांना भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचे एकत्र आशीर्वाद प्राप्त होतात.
पूजा विधि
श्रावणी सोमवारचे व्रत पाळण्यासाठी सकाळी स्नान करून पूजास्थान स्वच्छ करावे. यावेळी शिवमंदिरात जाऊन भगवान भोलेनाथाला जल अर्पण करावे. महादेवाचे व्रत पूर्ण भक्तिभावाने घ्यावे. या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्यासोबतच लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करावी. जेणेकरून एकादशी असल्याने भगवान विष्णूच्या पूजेचाही लाभ मिळेल. व्रताच्या वेळी श्रावण कथा ऐका. पूजा आटोपल्यानंतर प्रसादाचे वाटप करावे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :
- Numerology : 'या' तारखांना जन्मलेले लोक स्वभावाने श्रीमंत आणि अहंकारी असतात
- Samudra Shastra : ओठ सांगतात एखाद्या व्यक्तीचे नशीब आणि स्वभाव, कसे ते जाणून घ्या
- Chanakya Niti For Love : प्रेम जीवनातही कधीच अयशस्वी होत नाहीत ‘अशा’ व्यक्ती! जोडीदारात ‘हे’ गुण महत्त्वाचे...