Shiv Jayanti 2024: पहिलं चलन, पहिलं शक ते पहिली डिक्शनरी, अभिमान वाटावा अशा शिवाजी महाराजांच्या या गोष्टी तुम्हाला माहितीच हव्या!
Shiv Jayanti 2024: यंदा तिथीनुसार शिवजयंती 24 एप्रिलला साजरी करण्यात येण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांबद्दल अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्यांची माहिती लहानांपासून थोरांपर्यंत असायलाच हवी.
Shiv Jayanti 2024: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे केवळ महाराष्ट्राचे, हिंदूचेच नव्हे, तर सर्व भारतीयांचे, जगभरातील लोकांचे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे शिवरायांना आदर्श मानून त्यांचे आचारविचार अंगिकारण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीयेला झाला. त्यामुळे तारखेनुसार शिवजयंती 19 फेब्रुवारीला आणि तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीयेला अशा दोन शिवजयंती साजरी केली जाते. यंदा तिथीनुसार शिवजयंती 28 मार्चला साजरी करण्यात येण्यात येणार आहे. तर चला शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांबद्दल अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्यांची आपल्याला माहिती असायलाच हवी.
शिवाजी महाराजांचा अभिमान वाटावा अशा दहा गोष्टी
गनिमी कावा - शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर अतिशय चाणाक्ष पद्धतीने केला. गनिमी कावा हे एक युद्धतंत्र आहे. महाराष्ट्रातील डोंगर दऱ्यांचा वापर करत शिवाजी महाराजांनी बलाढ्य शत्रूला देखील धूळ चारल्याची अनेक उदाहरणे आपण ऐकली आहे.
आरमार - महाराष्ट्राला शेकडो किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुशे शत्रू समुद्रामार्गे हल्ला करु शकतो हे शिवाजी महाराजांनी नेमकं हेरले होते. त्यामुळे स्वराज्याच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली. ज्याचे आरमार त्याचा समुद्र हे धोरण छत्रपती शिवाजी महाराजांनी राबवले होते. कोकण किनापट्टीवर अनेक जलदुर्ग उभारुन स्वराज्याच्या सीमा संरक्षीत केल्या. सिंधुदुर्ग,विजयदुर्ग हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतिक आहे.
उत्तम स्थापत्यशास्त्र- शिवाजी महाराजांनी स्वराज्यात चारशे गड आपले अधिपत्याखाली आणले. महाराजांचा एक एक गड किल्ला उत्तम स्थापत्यशास्त्र आणि व्यवस्थापनाचे प्रतिक आहे. महाराजांचे विविध खात्यांचे नियोजन करणारे अष्टप्रधान मंडळ हे व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे.
पहिलं शक- 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक केला. त्यादिवसापासून महाराजांनी शिवराज्यभिषेक शक सुरू केले.
पहिले चलन- शिवराई हे चलन जारी केले. नवी कालगणना सुरु करुन नवे शक सुरु केले
पहिला शब्दकोश - फारसी आणि संस्कृत शब्दकोष तयार केला. तसेच फारशीच्या जागी संस्कृत शब्द वापरण्याचा हुकुम जारी केला.
महिलांचा आदर - महिलांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांची शिवरायांनी कधीच गय केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय करणारा स्वकीय असला तरी शिवरायांनी त्याला कठोर शिक्षा दिली. स्वराज्यातील व शत्रूंच्या स्त्रियांदेखील नेहमीच मानाने वागविले.
न्यायव्यवस्था- महाराजांच्या दरबारात न्यायसाठी आलेले प्रकरण तातडीने समोरासमोर तडीस नेले जात असे. कामात हयगय शिवाजी महाराजांना आवडत नसे.
पर्यावरण प्रेम - शेतकऱ्यांच्या, रयतेच्या पिकाला हात लावू नये. झाडांची कत्तल म्हणजे प्रजेला पिडा देणे होय. आरामारासाठी लाकूड हवे असेल तर एखादे झाड जुने, जीर्ण झाले असेल तरच त्याच्या मालकाच्या परवानगीने योग्य मोबादला देऊन तोडावे. यावरुन महाराजांचे पर्यावरण प्रेम दिसून येते.
निर्णयक्षमता : गरज असेल तेव्हा शत्रूवर चढाईचा निर्णय असो किंवा योग्य ठिकाणी माघार घेण्याचा निर्णय असो. हे महाराजांच्या युद्धनीतीचे सूत्र होते.
हे ही वाचा :