Shani Margi 2024 : शनीची मार्गी 'या' 3 राशींचं नशीब पालटणार; हातात खेळणार पैसा, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Shani Margi 2024 Positive Effects : वैदिक कॅलेंडरनुसार, शनि 15 नोव्हेंबरला कुंभ राशीत सरळ चालीत मार्गी झाला आहे. शनीच्या थेट चालीमुळे काही राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकतं.
Shani Margi 2024 : शनीच्या चालीचा परिणाम हा सर्व राशींवर होत असतो, यातच नुकताच 15 नोव्हेंबरला शनि (Shani) कुंभ राशीत मार्गी झाला आहे. म्हणजेच शनि कुंभ राशीत सरळ चालीत आहे. तब्बल 30 वर्षानंतर शनि कुंभ राशीत सरळ चाल चालत आहे, याचा शुभ परिणाम मुख्यत्वे 3 राशींवर होणार आहे. या काळात या राशींचं निद्रिस्त नशीब जागृत होईल. पद, पैसा आणि समृद्धी येईल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. याआधी काही काळ शनीच्या उलट चालीमुळे मेष राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळत नव्हतं, पण आता शनिदेवाच्या कृपेने तुमचं नशीब उजळणार आहे. हा काळ तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन येत आहे. या काळात तुमची नोकरीत प्रगती होईल. नोकरीत वाढीसह पदोन्नतीची संधी मिळेल. बॉस, अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. तुम्हाला उत्पन्नाचा नवीन स्रोतही मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुमची तब्येत सुधारेल. समाजात मान-सन्मान वाढेल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांना दीर्घ आजारांपासून आराम मिळू शकतो. या काळात तुमचं आरोग्य सुधारेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांनाही मोठा फायदा होऊ शकतो. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. या काळात तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचा व्यवसाय फायदेशीर होईल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. तुमची तब्येत सुधारेल.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील शनीचं हे संक्रमण शुभ राहील. तुमच्या व्यवसायात येणाऱ्या आव्हानांवर तुम्हाला उपाय मिळतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल. मित्रांसोबत धार्मिक स्थळी जाण्याचा बेत आखता येईल. या काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते, जी ऐकून तुमचं मन प्रसन्न होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :