एक्स्प्लोर
Vastu Tips : उत्तर की दक्षिण? घरातील खिडकीची योग्य दिशा कोणती? सुख, शांतीसाठी जाणून घ्या खिडकीशी संबंधित वास्तूशास्त्र...
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक वस्तूला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. याचा तुमच्या सुख, शांतीवर फार गंभीर परिणाम होतो.
Vastu Tips
1/7

वास्तूशास्त्रानुसार, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान हवं असेल तर त्यासाठी घरातील प्रत्येक वास्तू योग्य ठिकाणी असणं गरजेचं आहे.
2/7

त्याचप्रमाणे, घराची खिडकीचा देखील आपल्या आयुष्यात फार मोलाचा वाटा असतो. वास्तूशास्त्रानुसार, जर घराची खिडकी योग्य ठिकाणी नसेल तर वास्तूदोष लागतो.
3/7

याचं कारण म्हणजे, खिडकीच्याद्वारे बाहेरची हवा, ऊर्जा घरात येते. पण, खिडकीतून फक्त प्रकाश किंवा हवाच नाही तर सुख आणि सौभाग्यही येतं.
4/7

यासाठीच, घराची खिडकी योग्य दिशेला असावी. पण, घराची खिडकी उत्तर की दक्षिण दिशेला असावी? असा अनेकांना प्रश्न पडतो. याचंच उत्तर जाणून घेऊयात.
5/7

वास्तूशास्त्रानुसार, घराच्या खिडकीची दिशा उत्तर दिशेला असावी. उत्तर दिशेला असणाऱ्या खिडकीतून घरात सकारात्मक ऊर्जा येते.
6/7

जर तुमच्या घराची खिडकी दक्षिण दिशेला असेल तर त्या ठिकाणी वेळोवेळी पडदा लावा. खिडकीजवळ छान रोप लावा.
7/7

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 15 Jan 2025 11:27 AM (IST)
आणखी पाहा























