एक्स्प्लोर

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, होणार अपार धनलाभ

Weekly Lucky Zodiacs 18 To 24 November 2024 : नोव्हेंबरचा नवीन आठवडा काही राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या काळात 5 राशींचं आयुष्य सुखसोयींनी भरलेलं असेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.

Weekly Lucky Zodiacs 18 To 24 November 2024 : नोव्हेंबरचा नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. खरं तर, 18 नोव्हेंबरपासून महिन्याचा नवीन आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात बुधादित्य राजयोगासह (Budhaditya Rajyog) अनेक शुभ योग तयार होत आहेत, हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा हा आठवडा आनंद आणि सौभाग्य देईल. या आठवड्यात तुमची सर्व नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. आठवड्याची सुरुवात काही शुभ कार्याने होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ मिळेल. जे लोक अनेक दिवसांपासून आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार करत होते, त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. जे लोक दीर्घ काळापासून परदेशात करिअर करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या मार्गात येणारा अडथळा या आठवड्यात दूर होऊ शकतो. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

नोव्हेंबरच्या या आठवड्याच्या सुरुवातीला कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या कामात काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. परंतु, तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर या सर्वावर मात कराल. जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे तुम्हाला लाभ मिळतील आणि तुमची प्रगती होईल. तुम्ही कठीण आव्हानांना तोंड देण्यात यशस्वी व्हाल. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाबद्दल वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. बऱ्याच काळापासून रखडलेली बदली किंवा पदोन्नती देखील आता होऊ शकते. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा अतिशय अनुकूल असणार आहे. त्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांना नोव्हेंबरच्या या आठवड्यात काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. या आठवड्यात कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. नोकरदार लोकांना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. राजकारणाशी संबंधित या राशीच्या लोकांना काही मोठे पद किंवा जबाबदारी मिळू शकते. तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळू शकेल. तुमचे आधीच सुरू असलेले प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील आणि प्रियकरावर परस्पर विश्वास वाढेल.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

नोव्हेंबरचा हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी अधिक शुभ ठरेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने वेळ घालवाल. या काळात जमीन, घर किंवा वाहन खरेदी-विक्रीशी संबंधित इच्छा पूर्ण होऊ शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही वाद सुरू असतील तर ते वरिष्ठ किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने सोडवले जातील. व्यापारी लोकांना चांगला नफा मिळेल. या काळात तुम्ही एखाद्या योजनेत पैसे गुंतवू शकता, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात मोठा लाभ मिळू शकेल. नोकरदार लोक अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण करतील. तुमच्यावर अचानक काही जबाबदारी येऊ शकते.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

नोव्हेंबरचा हा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी लकी असणार आहे. तुमचं सौभाग्य या काळात वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत निर्माण झालेले मतभेद दूर होतील आणि कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील. व्यापारी लोकांसाठी आठवडा अतिशय शुभ राहील. या काळात भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. नोकरदार लोकांसाठी हा आठवडा खूप भाग्याचा असणार आहे. तुम्ही अचानक कुटुंबातील सदस्यांसोबत पिकनिक वगैरेची योजना आखू शकता. तुमचं वैवाहिक जीवन या काळात आनंदी राहील. तुमचं आरोग्य ठणठणीत राहील. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope 18 To 24 November 2024: पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On Balaji Tandale CCTV : सरपंच हत्येतील आरोपींना बालाजी तांदळेने साहित्य पुरवले? खरेदीचा CCTV समोर, देशमुखांचा गंभीर आरोपAnjali Damania On Walmik Karad Property : वाल्मिक कराडने कष्टाने संपत्ती कमवली नाही, सगळी संपत्ती जप्त करा- दमानियाABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 25 January 2025Yashomati Thakur Vs Anil Bonde : त्रिशुळाच्या नावाखाली गुप्ती वाटतायत, ठाकूर यांचा आरोप; अनिल बोंडे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Embed widget