Shani Margi 2024 : 15 नोव्हेंबरला शनीची चाल परिवर्तन; 'या' 4 राशींचा सुरु होणार सर्वात वाईट काळ, सोसावे लागेल संकट
Shani Margi 2024 : शनीच्या मार्गीमुळे 4 राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकट येणार आहे. या 4 राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
Shani Margi 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनी (Lord Shani) हा सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. येत्या 15 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी शनी (Shani Dev) आपली चाल बदलणार आहे. शनी सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. पण, शनीच्या या चाल परिवर्तनाचा परिणाम काही राशींवर नकारात्मक होणार आहे. शनीच्या मार्गीमुळे 4 राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकट येणार आहे. या 4 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
शनीच्या मार्गीमुळे कर्क राशींच्या लोकांच्या आयुष्यात एकामोगामाग संकटं येतील. या राशीच्या लोकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमच्या लव्ह लाईफमध्ये, वैवाहिक जीवनात तणावाचं वातावरण निर्माण होईल. नात्यात गैरसमज वाढतील. यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
शनीच्या मार्गी अवस्थेमुळे मकर राशीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होणार आहे. या राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या जाणवतील. त्यामुळे तुमच्या आहारावर लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमचं मन रमणार नाही. विनाकारण कोणाच्याही वाद-विवादात पडू नका. अन्यथा प्रकरण तुमच्यावर येऊ शकतं.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांना या कालावधीत अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या राशीच्या लोकांनी खर्चावर विनाकारण खर्च करु नये. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. तसेच, व्यवसायाशी संबंधित कोणताच मोठा निर्णय घेऊ नका. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. तसेच, तुमची आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आत्तापासूनच सावध राहणं गरजेचं आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
शनीच्या मार्गीमुळे मीन राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिघडू शकते. तसेच, तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमणार नाही. तसेच, घरात विनाकारण वाद होतील. त्यामुळे या सर्वांपासून दूर राहा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :