(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Gochar : 2025 मध्ये 'या' राशींवर बरसणार शनीची कृपा; विविध स्त्रोतांतून होणार धनवर्षाव, आरोग्यही राहील ठणठणीत
Shani Gochar : शनी 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून संक्रमण करुन मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीने मीन राशीत प्रवेश करताच मकर राशीच्या लोकांवर असलेली साडेसाती संपेल.
Shani Gochar : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) सर्व ग्रहांमध्ये सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. शनीची (Lord Shani) चाल ही सर्व ग्रहांमध्ये सर्वात हळू असल्या कारणाने तो कोणत्याही एका राशीत अडीच वर्षांपर्यंत राज्य करतो. शनी सध्या आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. त्यानंतर 2025 मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे.
शनी 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून संक्रमण करुन मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीने मीन राशीत प्रवेश करताच मकर राशीच्या लोकांवर असलेली साडेसाती संपेल. आणि मेष राशीवर साडेसाती सुरु होईल.याचा आणखी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनीच्या मीन राशीत संक्रमणाने वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फारच फलदायी असणार आहे. या राशीच्या लोकांच्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समस्या दूर होतील. तसेच, या काळात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी शनीचं मीन राशीत प्रवेश करणं फार लाभदायक ठरु शकते. या राशीच्या लोकांना शनीच्या ढैय्या आणि साडेसातीपासून मुक्ती मिळेल. तसेच, तुमच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतील. कामाच्या बाबतीत तुम्ही समाधानी आणि प्रसन्न असाल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
शनीच्या राशी परिवर्तनाने वृश्चिक राशीच्या लोकांना ढैय्या आणि साडेसातीपासून मुक्ती मिळेल. तुमचे आपापसांतील प्रेमसंबंध वाढतील. तसेच, वैवाहिक जीवन अतिशय सुखी असेल. या काळात तुम्ही तुमच्या नोकरीत बदल करु शकतात.
मकर रास (Capricorn Horoscope)
शनीच्या मीन राशीत संक्रमणाने मकर राशीच्या लोकांवर असलेली शनीची ढैय्या आणि साडेसाती संपेल. या राशीच्या लोकांचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, तुम्हाला अचानक धनप्राप्ती होईल. या काळात तुम्ही छोट्या-मोठ्या यात्रेला जाऊ शकता. धार्मिक कार्यात तुमचं मन जास्त रमेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :