Shani Gochar 2026 : नवीन वर्षात 1, 2 नाही तर तब्बल 4 वेळा बदलणार शनिची चाल; 'या' राशींची नव्या वर्षाची सुरुवातच लय भारी
Shani Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, 20 जानेवारी 2026 रोजी शनि देव उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यानंतर, 17 मे 2026 रोजी रेवती नक्षत्रात संक्रमण सुरु होईल.

Shani Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, सर्व ग्रहांमध्ये शनिदेवाला (Shani Dev) सर्वात महत्त्वाचं स्थान आहे. असं म्हणतात ज्यांच्या कुंडलीत शनीची स्थिती मजबूत असते अशा लोकांना आयुष्यात खूप यश मिळतं. तर, ज्यांच्या कुंडलीत शनिची स्थिती कमजोर असते अशा लोकांना आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नवीन वर्ष 2026 मध्ये शनिच्या चालीत बदल होणार आहे. त्यामुळे तीन राशींचं भाग्य उजळणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, 20 जानेवारी 2026 रोजी शनि देव उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यानंतर, 17 मे 2026 रोजी रेवती नक्षत्रात संक्रमण सुरु होईल. 9 ऑक्टोबरपर्यंत याच नक्षत्रात राहिल्यानंतर, उत्तरा भाद्रपद नक्षत्रात परत येणार आहेत. तर, 27 जुलै 2026 रोजी शनि मीन राशीत उल्टी चाल सुरु करणार आहेत. 11 डिसेंबर 2026 रोजी शनी मार्गी होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनिच्या चालीत होणाऱ्या बदलामुळे तीन राशींसाठी हा काळ सुवर्णकाळ ठरु शकतो. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेूयात
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, ऑफिसमध्ये तुम्हाला सिनिअर्सकडून चांगला पाठिंबा मिळेल. सरकारी तसेच, मिडिया क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ फार लाभदायी ठरणार आहे. मेष राशीच्या लोकांवर साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. असे असतानाही या राशीसाठी काळ शुभकारक असेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांवर 2026 चया संपूर्ण वर्षभरात शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे. या काळात तुमच्या हातात चांगली डील मिळू शकते. तसेच, परदेशात प्रवासाला जाण्याचे अनेक शुभ संयोग जुळून येणार आहेत. तुमची लव्ह लाईफ फार चांगली असेल. पार्टनरबरोबर काम करताना तुमची उत्सुकता अधिक वाढेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष पार लकी ठरणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवलया राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे. असे असतानाही या राशीला सकारात्मक परिणाम मिळतील. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















