Rahu Gochar 2026 : पैसा, ऐशोआराम आणि बरंच काही...नवीन वर्षात सर्वच लागणार दावणीला; राहूच्या डबल संक्रमणाने 'या' राशींवर ओढावणार संकट?
Rahu Gochar 2026 : राहू ग्रह 2 ऑगस्ट 2026 रोजी धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यानंतर 5 डिसेंबर 2026 रोजी मकर राशीत संक्रमण करणार आहे.

Rahu Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2026 ची सुरुवात अगदी जोरदार झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. काही शुभ राजयोग देखील निर्माण झाले आहेत. मात्र, या काळात क्रूर ग्रह राहूसुद्धा (Rahu Gochar) 2026 मध्ये तब्बल दोन वेळा संक्रमण करणार आहे. याचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे.
नवीन वर्षात राहू ग्रह 2 ऑगस्ट 2026 रोजी धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यानंतर 5 डिसेंबर 2026 रोजी मकर राशीत संक्रमण करणार आहे. राहू ग्रह कुंभ राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करणार आहे. या दोन्ही संक्रमणाचा 3 राशींवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
2026 मध्ये होणाऱ्या राहूच्या संक्रमणामुळे वृषभ राशीसाठी हा काळ फार कठीण ठरु शकतो. या काळात तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. तसेच, धनहानीचे संकेत आहेत. त्यामुळे या काळात कामाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. प्रवास कराल पण त्याचा लाभ तुम्हाला मिळणा नाही
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी राहू ग्रहाचं दोन वेळा संक्रमण नुकसानदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या चिंता अधिक वाढतील. तसेच, तुमच्या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. हाती आलेलं काम जाईल. नोकरदार वर्गातील लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. घरात वादविवाद होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. त्यामुळे या काळात कोणतीही नवीन जोखीम हाती घेऊ नका.
कन्या रास (Virgo Horoscope)
राहूच्या संक्रमणामुळे कन्या राशीच्या लोकांना प्रचंड नुकसानीहचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत. तसेच, तुमच्या कामातून तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. करिअरमध्ये तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. या काळात तुमच्या व्यवसायात प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. राहू ग्रहाच्या संक्रमणामुळे नवीन वर्षाची सुरुवातच तुम्ही फार कठोर असणार आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















