Shani Gochar 2026 : शनिच्या मार्गी चालीने 5 राशींची होणार चांदी; नवीन वर्षात मिळणार मोठ्ठं सरप्राईज, तुमची रास कोणती?
Shani Gochar 2026 : 28 नोव्हेंबर 2025 रोजी शनिदेवाने मीन राशीत मार्गी चाल केली. शनीच्या मार्गी चालीने अनेक राशींच्या तब्येतीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला तुमच्या कर्माचं चांगलं फळ मिळेल.

Shani Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनिने (Shani Dev) 28 नोव्हेंबर 2025 रोजी शनिदेवाने मीन राशीत मार्गी चाल केली. शनीच्या मार्गी चालीने अनेक राशींच्या तब्येतीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला तुमच्या कर्माचं चांगलं फळ मिळेल. त्यामुळे या काळात 5 राशींच्या लोकांसाठी नवीन वर्ष शुभकारक ठरणार आहे. या लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
या राशीच्या अकराव्या चरणात शनिचं संक्रमण होणार आहे. या काळात तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासमोर खुले होतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
या राशीच्या सातव्या चरणात शनिची मार्गी चाल आहे. त्यामुळे नवीन वर्षात यशाचे दार तुमच्यासाठी खुले होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. तसेच, मनासारखी नोकरी मिळाल्यामुळे तुम्ही फार खुश असाल. तुमच्या कामात स्थिरता येईल.
तूळ रास (Libra Horoscope)
या राशीच्या सहाव्या चरणात शनिचं संक्रमण झालं आहे. त्यामुळे नवीन वर्ष तुमच्यासाठी फार शुभकारक असेल. अनेक नवीन कार्याची सुरुवात तुम्ही या काळात सुरु करु शकता. तसेच, तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या तिसऱ्या चरणात शनिचं संक्रमण झालं आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
या राशीच्या दुसऱ्या चरणात शनिचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तसेच, कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नवीन वर्षात प्रवासाला जाण्याचे योग जुळून येणार आहेत.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















